हायलाइट्स:

  • बुल्लीबाई अॅपद्वारे मुस्लीम समाजातील महिलांची बदनामी
  • मुंबई पोलिसांनी २१ वर्षीय विशाल कुमारला केली अटक
  • मुंबईतील वांद्रे कोर्टाने १० जानेवारीपर्यंत सुनावली पोलीस कोठडी
  • मुख्य सूत्रधार महिलेला उत्तराखंडमध्ये केली अटक, कोठडीसाठी कोर्टात हजर करणार

मुंबई : बुल्लीबाई अॅप (Bulli Bai app) प्रकरणातील आरोपी विशाल कुमार याला आज, मंगळवारी पोलिसांनी मुंबईतील वांद्रे कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका मुख्य संशयित आरोपी महिलेला अटक केली आहे. ही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे. तिची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेल्या २१ वर्षीय विशाल कुमार याला बुल्लीबाई अॅप प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेच्या पथकाने बेंगळुरूतून काल, सोमवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. जवळपास दहा तासांहून अधिक तास चौकशी केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. आज, मंगळवारी त्याला पोलिसांनी वांद्रे कोर्टात हजर केले. त्याला १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Bulli Bai app case : ‘बुल्लीबाई’ प्रकरणी मुंबई पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे, आणखी एका मुख्य सूत्रधाराला…
शंभर मुस्लिम महिलांचा पुन्हा ऑनलाइन लिलाव;सहा महिन्यांनंतर आणखी एका आक्षेपार्ह अॅप

पोलीस तपास सुरू

बुल्लीबाई अॅपद्वारे मुस्लीम समाजातील महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि त्यांची बोली लावली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर, या प्रकरणात १ जानेवारी रोजी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास आणखी वेगात सुरू केला आहे. अॅप लॉंच करणाऱ्या प्लॅटफॉर्मशी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला आहे. त्यांच्या उत्तरानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले.

Sulli Deals : सुल्ली डील अॅपवर मुस्लीम महिलांचे फोटो आणि किंमत; महिला आयोगाने दिले ‘हे’ आदेश

मुख्य सूत्रधार महिलेला उत्तराखंडमधून घेतले ताब्यात

या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असतानाच, मुंबई पोलिसांनी एका महिलेला मंगळवारी सकाळी उत्तराखंडमधून ताब्यात घेतले आहे. बुल्लीबाई अॅप प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. बुल्लीबाई अॅपसंबंधित तीन खाती ही महिला हाताळत होती आणि तिचा साथीदार विशाल कुमार याने खालसा सुपरमॅसिस्ट या नावाने खाते उघडले होते. ३१ डिसेंबर रोजी त्याने या अकाउंटचे नाव बदलून शिखांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचा काहीही संबंध नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दहाहून अधिक तासांच्या चौकशीनंतर विशालला केली होती अटक

सिव्हिल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेल्या २१ वर्षीय विशालला चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. दहाहून अधिक तास चौकशी केल्यानंतर आज, मंगळवारी त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, मंगळवारी मुंबई पोलिसांनी महिलेला उत्तराखंडमधून ताब्यात घेतले. ती या प्रकरणात मास्टरमाइंड असल्याचा संशय आहे. तिची कोठडी मिळावी, यासाठी उत्तराखंड येथील कोर्टात हजर केले जाईल. तिची कोठडी कोर्टाकडून मिळाल्यानंतर तिला मुंबईत चौकशीसाठी आणण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here