या चाचण्यांसाठी दोन प्रयोगशाळांची व्यवस्था करण्यात आली आहे. आज चाचण्या झाल्यानंतर उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत त्याचे अहवाल मिळण्याची शक्यता आहे. अहवाल आल्यानंतरच करोना नेगेटिव्ह प्रवाशांना घरी सोडण्यात येईल.

कर्डिलिया

मुंबई महानगरपालिकेची पथके ग्रीन गेट येथे दाखल झाली आहेत. याठिकाणी क्रुझमधील सर्व प्रवाशांची स्क्रीनिंग केली जाईल.

हायलाइट्स:

  • कॉर्डेलिया क्रुझवर तब्बल २००० प्रवासी आहेत
  • यापैकी काही प्रवाशी करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांना गोव्यात उतरण्यास मज्जाव करण्यात आला होता

मुंबई : मोठ्याप्रमाणावर करण्यासाठी रुग्ण सापडल्यामुळे चर्चेत आलेले कॉर्डेलिया क्रुझ मंगळवारी संध्याकाळी मुंबईच्या किनाऱ्यावर दाखल होणार आहे. गोव्यात असताना या क्रुझमधील तब्बल ६६ प्रवासी करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेची पथके ग्रीन गेट येथे दाखल झाली आहेत. याठिकाणी क्रुझमधील सर्व प्रवाशांची स्क्रीनिंग केली जाईल. यासाठी पालिकेच्या पाच अॅम्ब्युलन्स ग्रीन गेटवर तैनात ठेवण्यात आल्या आहेत. सर्वप्रथम क्रुझवरील ६६ करोना पॉझिटिव्ह प्रवाशांना या रुग्णवाहिकांद्वारे रिचर्डसन अँण्ड क्रुडास हॉटेलमध्ये नेले जाईल. तर उर्वरित प्रवाशांची करोना चाचणी केली जाईल. या चाचणीचा अहवाल येईपर्यंत प्रवाशांना क्रुझमधून उतरुन दिले जाणार नाही.

या चाचण्यांसाठी दोन प्रयोगशाळांची व्यवस्था करण्यात आली आहे. आज चाचण्या झाल्यानंतर उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत त्याचे अहवाल मिळण्याची शक्यता आहे. अहवाल आल्यानंतरच करोना नेगेटिव्ह प्रवाशांना घरी सोडण्यात येईल. मात्र, त्यांच्या हातावर शिक्का मारला जाईल. त्यामुळे या प्रवाशांना सात दिवस होम क्वारंटाईन राहावे लागेल. तर करोना पॉझिटिव्ह प्रवाशांना रिचर्डसन अँण्ड क्रुडास हॉटेलमध्ये नेण्यात येईल. क्रूझवरील क्रू मेंबरमधील एकच सदस्य अँटिजेन चाचणीत करोना पॉझिटिव्ह आढळला आहे. एकाही प्रवाशाला करोनाचा संसर्ग झाला नसल्याचं मुंबई पोर्ट ट्र्स्ट आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

कॉर्डेलिया क्रुझवर तब्बल २००० प्रवासी आहेत. यापैकी काही प्रवाशी करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांना गोव्यात उतरण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे हे प्रवासी रविवारी रात्रीपासून क्रुझवरच अडकून पडले आहेत.

मुंबई पुन्हा करोनाचा हॉटस्पॉट, लॉकडाऊनबाबत पालिका आयुक्त म्हणाले…

‘महाराष्ट्रात डेल्टापेक्षा ओमायक्रॉनचाच जोर अधिक’

सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात डेल्टापेक्षा ओमायक्रॉनचाच जोर अधिक आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचे वर्चस्व अधिक आहे, असे वक्तव्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी केले. भारतात डेल्टा आणि Omycron व्हेरिएंट वगळता इतर कोणताही व्हेरिएंट अस्तित्त्वात नसल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या १५ ते २० दिवसांत राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. १५ दिवसांपूर्वी २००-३०० च्या आसपास असणारा आकडा आता १२ हजारांवर जाऊन पोहोचला आहे. सध्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची लक्षणे आणि करोना प्रसाराचा प्रचंड वेग पाहता, हे ओमायक्रॉन व्हेरिएंटचेच रुग्ण असण्याची शक्यता डॉ. राहुल पंडित यांनी वर्तविली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: कॉर्डेलिया क्रूझ मुंबईत येणार आहे बीएमसीची टीम आणि रुग्णवाहिका कोरोनाव्हायरस रूग्णांच्या तपासणीसाठी तैनात
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here