काही दिवसांपूर्वी जॅकलिनला नाताळच्या सेलिब्रेशनसाठी कुटुंबियांकडं जायचं होतं. परंतु ईडनं तिला परवानगी नाकारली होती. त्यामुळं जॅकलिन कायद्याच्या आणि चौकशीच्या कचाट्यात सापडली आहे.
गेल्या महिन्यात जॅकलिनला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडविण्यात आलं होतं. दोनशे कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) लुक आउट नोटीसवर ही कारवाई करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?हे मूळ प्रकरण सुकेश चंद्रशेखर या व्यक्तीशी निगडित आहे. सुकेश, त्याची पत्नी लीना व अन्य १२ आरोपींनी मोठ्या उद्योगपतींच्या पत्नीकडून दोनशे कोटी रुपयांची खंडणी उकळली होती. हे प्रकरण दिल्लीतील असून, त्याबद्दल सुकेश तिहार तुरुंगात होता; पण सध्या तो जामिनावर बाहेर आहे. जामिनावरून आल्यानंतर तो जॅकलिन फर्नांडिसला सातत्याने भेटत होता; तसेच त्याने तिला कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचेही समोर आले होते.
जॅकलिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती अक्षय कुमार आणि नुसरत भरूचासोबत राम सेतू या चित्रपटात दिसणार आहे. त्याशिवाय बच्चन पांडे या चित्रपटातीही ती भूमिका साकारणार आहे. तसंच सलमान खानच्या किक २ चित्रपटात ती दिसणार आहे.