वॉशिंग्टन, यूएसए:

घरच्या घरी करोना चाचणी करून करोना विषाणूचं ‘ओमिक्रॉन‘ स्वरुप ओळखलं जाऊ शकतं का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर, या प्रश्नाचं उत्तर आहे हो… परंतु, घरच्या घरी केल्या जाणाऱ्या चाचण्यांची अचूकता कमी असली तरी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या चाचण्या उपयोगी ठरत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

अमेरिकेतील काही आरोग्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, ‘व्हायरल लोड’ कमी असताना ओमिक्रॉन अनेकदा चाचणीत पकडले जात नाहीत. ‘होम टेस्ट’च्या वापराबाबत सरकारच्या शिफारशींमध्ये बदल करण्यात आलेला नाही. परंतु, ताबडतोब करोना संसर्ग ओळखण्यासाठी करोना टेस्ट किटचा वापर उपयोगी ठरू शकतो.

‘कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट’च्या अध्यक्ष डॉ. एमिली वोल्क यांच्या म्हणण्यानुसार, ‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या टेस्ट किट कोविड-१९ ला शोधण्यात यशस्वी ठरतात. मग तो विषाणू डेल्टा स्वरुपात असो, अल्फा स्वरुपात असो किंवा ओमिक्रॉन स्वरुपात…

Covid19: फ्रान्समध्ये आढळला करोनाचा आणखीन एक व्हेरियंट, ‘ओमिक्रॉन’पेक्षाही संक्रामक!
Corona Vaccination: करोना लसीच्या तिसऱ्या डोसमुळे ८८ टक्के संरक्षण

कोविडच्या नवनव्या स्वरुपांच्या चाचणीत ‘रॅपिड चाचणी‘ अजूनही योग्य ठरतेय किंवा नाही, याची पडताळणी सरकारी शास्त्रज्ञ तपास करत आहेत.

याच आठवड्यात अन्न आणि औषध प्रशासन (FDA) नं दिलेल्या माहितीनुसार, रॅपिड चाचणीत ‘ओमिक्रॉन’ची ओळख पटवता येणं शक्य आहे. परंतु, बऱ्याचदा ‘व्हायरल लोड’ कमी असताना संक्रमणाची ओळख पटवता येत नाही.

‘होम टेस्ट’मध्ये अचूकता थोडी कमी असली तरी त्याचे अनेक फायदे आहेत. याचा वापर करून तुम्ही तुमचं कुटुंब आणि मित्र परिवाराची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकता, असं अमेरिकन संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी म्हटलंय.

India Sri Lanka: पंतप्रधान मोदींनी पूर्ण केलं राजीव गांधी यांचं अपूर्ण स्वप्न; श्रीलंकेसोबत महत्त्वाचा करार
Afghanistan: दुकानांतील मॉडेल्सचे पुतळे ‘गैर-इस्लामिक’, मुंडके छाटले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here