पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना जानेवारी अखेरीस मेट्रोतून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. पुण्यात वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी-चिंचवडला पिंपरी ते फुगेवाडी या दरम्यान मेट्रो धावणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून उद्घाटनाची तारीख प्राप्त होणार असून, अंदाजे जानेवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यातच मेट्रोचं लोकार्पण होणार आहे. (मेट्रो बातम्या टाका)
मेट्रोच्या गरवारे महाविद्यालय स्थानकाचे जवळपास ९५ टक्के काम पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्यावतीने माध्यम प्रतिनिधींसाठी पाहणी दौरा आणि पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या लोकार्पणाबाबतची माहिती दिली. Omicron cases In Maharashtra Today: महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा धोका आणखी वाढला; एकट्या मुंबईतच…
कार्यकारी संचालक (कार्य) अतुल गाडगीळ, कार्यकारी संचालक (स्टेशन) गौतम बिऱ्हाडे, संचलन आणि प्रणाली विभागाचे कार्यकारी संचालक विनोद अग्रवाल यावेळी उपस्थित होते.
‘वनाज ते गरवारे’ हे पाच किलोमीटरचे अंतर आणि पिंपरी ते फुगेवाडी या सात किलोमीटरच्या अंतरात मेट्रो धावणार आहे. या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी पाच स्थानके कार्यान्वित होतील. या स्थानकांपैकी गरवारे महाविद्यालय आणि संत तुकारामनगर या स्थानकांचे काम ९५ टक्के पूर्ण झालं आहे. तर, अन्य स्थानकांची कामे ९० टक्क्यांपर्यंत झाली आहेत. उर्वरित कामे १५ जानेवारीपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत, अशी माहिती यावेळी दीक्षित यांनी दिली.