हायलाइट्स:

  • गोदावरी नदीत युवतीने मारली उडी
  • शोधाधोश करूनही काहीच तपास नाही
  • सायंकाळी अंधार पडल्याने थांबवलं शोधकार्य

अहमदनगर : कोपरगावमधून जाणाऱ्या नगर-मनमाड महामार्गावरील गोदावरी नदीच्या मोठ्या पुलावरून एका युवतीने नदीत उडी मारली. त्यावेळी दुचाकीवरून या पुलावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने ही घटना पोलिसांना कळवली. पोलीस आणि अग्निशामक दलाने सायंकाळी सातपर्यंत शोधाधोश करूनही काहीच तपास लागला नाही. पुलावर युवतीची बॅग आढळून आली असली तरी ती कोण होती, तिने उडी का मारली? याची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. दुपारी सुरू करण्यात आलेलं शोधकार्य सायंकाळी अंधार पडल्याने थांबवण्यात आलं आहे. (महाविद्यालयीन तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न)

मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पुलावर आपली बॅग ठेऊन एका युवतीने नदीत उडी घेतली. त्यावेळी तेथून सर्पमित्र संदीप खिरे दुचाकीवरून जात होते. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने पुलावर धाव घेतली. सर्वांनी पुलावर आणि खाली शोधाशोध केली. मात्र, काहीही हाती लागले नाही. त्यानंतर पोहणाऱ्या स्थानिक आणि मच्छिमारी करणाऱ्या नागरिकांचीही पोलिसांनी मदत घेतली.

Omicron cases In Maharashtra Today: महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा धोका आणखी वाढला; एकट्या मुंबईतच…

कोपरगाव नगर पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. अग्निशामक दलाचे मदन निंदाने, कार्तिक मालकर, चेतन गव्हाणे, घनधाम कुर्हे यांनी नदीत उतरून शोध घेतला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. नदीत दूरपर्यंत शोध घेण्यात आला. मात्र, काहीही हाती लागले नाही.

दरम्यान, तब्बल चार तास शोध घेतल्यानंतर अंधार पडल्याने मोहीम थांबवण्यात आली. पुलावर ठेवलेल्या बॅगवरून ती महाविद्यालयीन युवती असल्याचं समजते. मात्र, तिचं नाव स्पष्ट झाले नव्हते. सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यातही कोणी युवती बेपत्ता झाल्याप्रकरणी तक्रार घेऊन आले नव्हते. त्यामुळे या घटनेचे अद्याप गूढ उकलेलं नाही. पोलीस प्रत्यक्षदर्शींकडून अधिक माहिती मिळवत आहेत. खिरे यांनी युवतीला उडी मारताना पाहिले, मात्र नंतर ती कोठेच दिसली नाही. त्यामुळे गूढ कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here