हायलाइट्स:
- राज्यात ओमिक्रॉन आणि करोना रुग्णांची संख्या वाढली
- राज्यभरात दिवसभरात ७५ जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग
- एकट्या मुंबईतच ४० जण ओमिक्रॉनबाधित
- राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिला अहवाल
राज्यात ओमिक्रॉन आणि करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात कठोर निर्बंध किंवा लॉकडाउन लागू केले जाण्याची शक्यता अधिक आहे. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनी याबाबत संकेत दिले आहेत. ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा आपापल्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याचवेळी आज, मंगळवारी मुंबईसह राज्यातील ओमिक्रॉनबाधितांची प्रसिद्ध झालेली आकडेवारी चिंतेत भर टाकणारी आहे. आज राज्यात ७५ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील मुंबईतील ओमिक्रॉनबाधितांची संख्या ४० आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ही माहिती दिली आहे.
ओमिक्रॉनबाधित किती आणि कुठे?
आज राज्यात ७५ जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ही आकडेवारी दिली आहे. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –
मुंबईत ४०, ठाणे महापालिका क्षेत्रात ९, पुणे महापालिका क्षेत्रात ८, पनवेलमध्ये ५, नागपूर आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी ३, पिंपरी-चिंचवडमध्ये २ तर भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्र, उल्हासनगर, सातारा, अमरावती आणि नवी मुंबईत प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. आजपर्यंत राज्यात ओमिक्रॉनबाधितांची एकूण संख्या ६५३ वर पोहोचली आहे.
Dr.Ravi Godse | ‘ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढली, तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी’