सांगली: सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात करोनाचे १२ नवीन रुग्ण आढळले असून जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या २३ तर राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता १४७ वर पोहचली आहे.

गंभीर बाब म्हणजे इस्लामपुरात आढळलेले करोनाचे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. कुटुंबातील आधीच्या करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने या सर्वांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे सांगलीत करोना रुग्णांची संख्या २३ पर्यंत गेल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. आरोग्य यंत्रणाही हादरून गेली आहे.

घराचा परिसर केला सील

इस्लामपुरातील त्या कुटुंबाच्या संपर्कातील आणखी बारा जणांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे शुक्रवारी दुपारी स्पष्ट झाले. गुरुवारी २४ जणांचे नमुने तापासणीसाठी पाठविले होते. त्यातील १२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने प्रशासन हादरलं आहे. इस्लामपूरमध्ये आता कोरोनाबाधितांची संख्या २३ वर पोहोचली आहे. सोमवारी २३ मार्च रोजी या कुटुंबातील चार जणांचे तर बुधवारी २५ मार्चला पाच जणांचे आणि गुरुवारी २६ मार्च रोजी आणखी दोघांचे रीपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. आज हा आकडा एकदम १२ने वाढल्यामुळे ही संख्या आता २३ झाली आहे. प्रशासनाने या कुटुंबाचं घर असलेल्या परीसरातील ५०० मीटर अंतरावरील सर्व सिमा सील केल्या आहेत. प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून अन्य कुणाला करोनाची लागण होऊ नये म्हणून शक्य तेवढ्या उपाययोजना केल्या जात आहेत.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत ४२४० संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील ४०१७ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. आतापर्यंत करोनाचे १९ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here