औरंगाबाद : गेल्या तीन-चार दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील सोशल मीडियावर एका प्रेमी युगुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात दुचाकीवर बसलेल्या आपल्या प्रियकराच्या मांडीवर बसून एक तरुणी अश्लील कृत्य करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता पोलिसांनी किसिंग स्टंट करणाऱ्या या तरुणाला अटक केली असून, ‘तडप’ सिनेमाचे ट्रेलर पाहून मित्रांनी दिलेले चॅलेंज स्वीकारत त्याने हे स्टंट केल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज गौतम कांबळे (२३, रा. अलोकनगर, बीड बायपास) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. मित्रांसोबत बसलेला असतांना त्याने ‘तडप’ सिनेमाचे ट्रेलर पाहिले. याचवेळी मित्रांनी त्याला स्टंट करण्याचे चॅलेंज दिले आणि सूरजनेही हे चॅलेंज स्वीकारत प्रेयसीला बोलावून घेतले. त्यानंतर त्याचवेळी शहरातील क्रांती चौक ते सेव्हन हिल आणि सेव्हन हिल ते क्रांती चौक असा प्रवास स्टंट केला. याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या अनेकांनी या स्टंट मोबाईलमध्ये कैद करत व्हायरल केला.

चालत्या बाइकवर कपलचा ‘किसिंग स्टंट’; औरंगाबादचा व्हिडिओ व्हायरल
या व्हिडीओनंतर शहरात एकच खळबळ उडाली. तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शहरात हे काय चाललं आहे म्हणत खालच्या अधिकाऱ्यांना त्या जोडप्याचा शोध घेण्याचा सूचना दिल्या. पोलीस या तरुणाचा शोध घेत असतानाच शहरातील अपेक्स हॉस्पिटल येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून जिन्सी पोलिसांनी तात्काळ या तरुणाला ताब्यात घेत अटक केली.

प्रेमी युगुल लवकरच लग्न करणार….!

किसिंग स्टंट करणारा सूरज शहरातील सूतगिरणी चौकातील कापड दुकानात सेल्समन म्हणून काम करतो. तो सद्या एम.ए. चे शिक्षण घेत असून, त्याची १९ वर्षीय प्रेयसी महाविद्यालयात शिक्षण घेते. दोघेही नातेवाईक असून लवकरच लग्न करणार असल्याची माहिती आहे.

ST Strike Update : एसटीचे ५० कर्मचारी कामावर रूजू तर १२ जणांवर कठोर कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here