हिंगोली : राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत खर्चाची पीएफएमएस प्रणालीवर झालेली नोंद व त्यानंतर आयएमआयएस प्रणालीवरील नोंदीत तब्बल १४२ कोटी रुपयाची तफावत आढळून आली आहे. राज्य पाणी व स्वच्छता विभागाने जीवन प्राधिकरणासह सर्व संभतीत यंत्रणाना तातडीने पत्र पाठवून तातडीने नोदी अन् महिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना व जोडणीची कामे केली जात आहेत. ग्रामीण भागातून वार्षिक कृति आराखड्यात समाविष्ट असेलल्या गावामधून ती होत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा योजना, भूजल सर्वेक्षण विभागामार्फत ही कामे केली जात आहेत.

ST Strike Update : एसटीचे ५० कर्मचारी कामावर रूजू तर १२ जणांवर कठोर कारवाई

या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी दिला जातो. दरम्यान या योजना वरील खर्चाची पीएफएएमएस प्रणालीवर नोंद घेणे बंधनकारक आहे. त्या नुसार सर्व जिल्ह्यातून या योजनावर झालेल्या खर्चाची महिती नोदवीली जाते. त्यानंतर शासनाने आयएएमआयएस प्रणालिमध्ये नोंदी घेण्याच्या दिल्या आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांनी नोंदी घेण्याचे काम सुरू केले आहे.

आतापर्यंत दोन्ही प्रणालीमध्ये झालेल्या नोंदीमध्ये तब्बल १४२ रुपयांची तफावत आढळून आली आहे. या प्रकारामुळे राज्य अभियान संचालकांनी राज्यातील जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवले असून तफावततिची ही बाब गंभीर असल्याचे नमूद केले आहे.

‘तडप’ सिनेमाचा ट्रेलर पाहून केलं किसिंग स्टंट आणि.., तरुणाने अटकेनंतर पोलिसांना सांगितलं सत्य

जिल्हानिहाय तफावतीचे अशी रक्कम

नगर १३.१५ कोटी, अकोला ३३.१०लाख, अमरावती १८; कोटी, औरंगाबाद २.८३ कोटी, बीड १.२२ कोटी, भंडारा २.८२ कोटी, बुलढाणा ८.५६ कोटी, चंद्रपूर २.७९ कोटी, धुळे १.८३ कोटी, गडचिरोली १.८२ लाख, गोंदिया ४६.७१ लाख, हिंगोली ११ हजार, जळगाव ६.२५ कोटी, जालना २६.७१ कोटी, कोल्हापूर ५.९६ कोटी, लातूर २.६३ कोटी, नागपूर १.४० कोटी, नांदेड ४.८४ कोटी, नंदुरबार ५९.८४ लाख, नाशिक १.८२ कोटी, उस्मानाबाद १.१८ कोटी, परभणी २ कोटी, पुणे ११.२३ कोटी, रायगड २.९१ कोटी, सांगली ७.७६ कोटी, सातारा १४.७५ कोटी, सोलापूर २.२४ कोटी, ठाणे १.६८ कोटी, वर्धा १.११ कोटी, वाशिम १६ लाख, यवतमाळ १२ लाख रूपये.

Good News! राज्यातील ‘या’ ८ जिल्ह्यांतील ओबीसींच्या नोकरभरतीचा मार्ग मोकळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here