औरंगाबाद : भाजप-शिवसेना युतीचा पूल केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच बांधू शकतात, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी करून काही तास उलटत नाही तोच आता सत्तारांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

अब्दुल सत्तार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आपल्या याच दौऱ्यात त्यांनी आज सकाळी ( बुधवार ) केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी जात दानवेंची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये गळाभेट झाली. तसं सत्तार आणि दानवे यांची दोस्ती जुनीच आहे. पण काल शिवसेना-भाजप युतीबाबत सत्तार यांनी केलेल्या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी झालेली ही भेट राज्यात राजकीय भूकंप तर आणणार नाही ना?, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

msrtc strike news : एसटी कर्मचाऱ्यांचा अखेर संयम सुटला, थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
काय म्हणाले होते सत्तार….

उद्धव ठाकरे हे राज्यातील कर्तव्यदक्ष राजकारणी आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व ते उत्तम प्रकारे करत आहेत. तर नितीन गडकरी हे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे नेते आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीचा पूल जोडायचं त्यांनी मनावर घेतलं तर ते उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे जातील, त्यांना विनंती करतील, कारण शेवटी भाजप सेना युतीचा निर्णय उद्धव साहेबच घेऊ शकतात”, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते.

‘बाळ धनंजय, माईने समाजाला खूप दिलं पण…’, माईंच्या निधनानंतर धनंजय मुंडेंची भावनिक आदरांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here