Dhananjay Munde After The Sindhutai Sapkal Death | ‘बाळ धनंजय, माईने समाजाला खूप दिलं पण…’, माईंच्या निधनानंतर धनंजय मुंडेंची भावनिक आदरांजली | Maharashtra Times
औरंगाबाद : ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधूताई सकपाळ यांचे मंगळवारी पुण्यात दुःखद निधन झाले. त्यांच्या या निधानाच्या बातमीनंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. तर त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या अनेक प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा दुःख व्यक्त करत, माझ्या कार्याची पोहोच पावती देणाऱ्या माईंच्या निधनाने व्यथित झालो असल्याचं म्हटलं आहे. (Emotional tribute to Dhananjay Munde after the सिंधुताई सपकाळ यांचे निधन)
यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, बाळ धनंजय… माईने समाजाला खूप दिलं, पण सरकार म्हणून माईच्या संस्थेला काहीतरी देण्याचा पहिला मान तुझाच रे…! असं म्हणून माझ्या कार्याची अभिनव पोहोच पावती देणाऱ्या अनाथांची माई, पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने आपण व्यथित झालो आहोत, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. ST Strike Update : एसटीचे ५० कर्मचारी कामावर रूजू तर १२ जणांवर कठोर कारवाई आज माई सिंधूताई सपकाळ यांच्या निधनानंतर धंनजय मुंडे यांनी आठवण जागी करत, निस्वार्थ समाजसेवा या शब्दाला ‘माई’ हा समानार्थी शब्द असल्याचे म्हणत, दीन-दुबळ्यांचे हक्काचे आशास्थान काळाच्या पडद्याआड गेले, अशा भावनिक शब्दात माईंना आदरांजली वाहिली आहे.
सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडला असून, आज ( बुधवारी ) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजून १० मिनीटांनी नवी पेठेतील ठोसर पागेल येथे महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार दफणविधी केला जाणार आहे. (Emotional tribute to Dhananjay Munde after the sindhutai sapkal death)