हायलाइट्स:

  • तालिबानी पायलटचं हेलिकॉप्टरसह हवेत उड्डाण, ४० सेकंदात अपघात
  • ‘हेलिकॉप्टर उडवणं म्हणजे, गाढवांना चालवणं नाही’
  • सोशल मीडियात हेलिकॉप्टर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

काबूल, अफगाणिस्तान :

एखादी गोष्टी फुकटात मिळावी आणि त्याचं मोलही लक्षात येऊ नये, अशा कितीतरी गोष्टी आपल्या आजुबाजुला घडताना तुम्हाला सहज नजरेस पडतील. तालिबानचंही असंच होताना दिसतंय. अमेरिकेची अब्जावधी डॉलरची हेलिकॉप्टर ताब्यात घेतलेल्या तालिबानी दहशतवाद्यांना या हत्यारांचं मोलही समजू नये, ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. असंच एक हेलिकॉप्टर हाताळणाऱ्या तालिबानी पायलटनं अशा पद्धतीनं हेलिकॉप्टर उडवलं की ते काही मिनिटांतच दुर्घटनेला बळी पडलं. इतकंच नाही तर यामुळे परिसरात उपस्थित असलेल्या इतर नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कंधार शहरात ही घटना घडली. तालिबानकडून कंदाहारमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोमवारी अनेक हेलिकॉप्टर पाठवली होती. या दरम्यान एका तालिबानी पायलटच्या निष्काळजीपणामुळे एक हेलिकॉप्टर हवेत उड्डाणानंतर अवघ्या ४० सेकंदात जमिनीवर कोसळलं.

या अपघातात पायलट जखमी झाल्याचं समजतंय. तालिबानी पायलटचा हा मूर्खपणा आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हेलिकॉप्टरसहीत उड्डाणासाठी योग्य प्रशिक्षण, कौशल्य आणि अनुभवाची गरज असल्याचा सल्लाही नेटिझन्स तालिबानला देत आहेत.

Afghan Crisis: यादवीत होरपळणाऱ्या अफगाणिस्तानासाठी भारत-पाकचे एक पाऊल पुढे
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात स्वत: भूकेलेल्या आई-बापांवर पोटच्या पोरांना विकायची वेळ!
Watch Video: ‘डूरंड लाईन’वर तालिबान्यांनी पाक लष्कराला सळो की पळो करून सोडलं!

‘हेलिकॉप्टर उडवणे, गाढव चालवणे नाही’

कर्नल रहमान रहमानी नावाच्या एका ट्विटर युझरनं तालिबान्यांच्या या मूर्खपणावर टिप्पणी केलीय. ‘हेलिकॉप्टर उडवणं म्हणजे, गाढवांना चालवणं नाही’ अशी टिप्पणी रहमानी यांनी केलीय.

देशाची सत्ता बळजबरीनं ताब्यात घेतल्यानंतर तालिबानच्या हातात अमेरिकेची अनेक हेलिकॉप्टर लागली आहेत. यापैंकी भारताकडून अफगाणिस्तानला मिळालेल्या काही हेलिकॉप्टरचाही समावेश आहे.

तालिबानी अनेकदा आपल्या दहशतवाद्यांच्या सैन्यासह या हेलिकॉप्टरचं प्रदर्शन करताना दिसतात.

India Sri Lanka: पंतप्रधान मोदींनी पूर्ण केलं राजीव गांधी यांचं अपूर्ण स्वप्न; श्रीलंकेसोबत महत्त्वाचा करार
Coronavirus in China: करोनाची धडकी; केवळ तीन रुग्ण आढळले आणि संपूर्ण शहर लॉकडाऊन!
Watch Video: एक्सप्रेस-वेवर गाड्यांशी स्पर्धा करणारा शहामृग कॅमेऱ्यात कैद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here