हायलाइट्स:

  • महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढतेय
  • राज्यातील १५ मंत्री आणि ७० आमदारांना करोना
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती
  • राज्यात तूर्तास लॉकडाउन लागू करण्याचा विचार नाही

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात करण्यासाठी प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. ओमिक्रॉन (ओमिक्रॉन) विषाणूचा संसर्गही फैलावत आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आता हा विळखा अधिक घट्ट होत चालला असून, महाराष्ट्रातील जवळपास ७० आमदार आणि १० ते १५ मंत्र्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (राजेश टोपे) यांनी ही माहिती दिली.

Corona in Mumbai : मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, BMC अधिकारी म्हणाले…
महाराष्ट्रात करोना आणि ओमिक्रॉनचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची बैठक झाली. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सध्या तरी राज्यात लॉकडाउन लावण्याचा विचार नाही. मात्र, करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालायचा असेल तर, गर्दी टाळली पाहिजे. त्यामुळे काही निर्बंध लावण्यात येतील, असे संकेत त्यांनी दिले. राज्यातील मंत्री आणि आमदारांनाही करोनाचा संसर्ग झालेला आहे. याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. राज्यातील ७० आमदार आणि १० ते १५ मंत्री करोनाबाधित असल्याचे ते म्हणाले. हे सर्व दररोज कामानिमित्त फिरायचे. लोकांच्या सातत्याने संपर्कात होते. त्यामुळे या आमदार आणि मंत्र्यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

Omicron in Maharashtra : अॅलर्ट राहा, घाबरू नका, ओमिक्रॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी आली गुड न्यूज
प्रवीण दरेकर यांनाही करोना

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी आयसोलेशनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी. थोडी जरी लक्षणे दिसत असल्यास तात्काळ करोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यात तुर्तास Lockdown नाही पण ‘हे’ सहा कठोर निर्बंध लागण्याची शक्यता
Corona in Maharashtra: राज्यात करोनाचा कहर सुरूच; मुंबईतील आकडेवारीने चिंता वाढली, ‘ही’ आहे ताजी स्थिती

एकनाथ शिंदेंसह अनेक जणांना करोना

महाराष्ट्रात आतापर्यंत १० ते १५ मंत्री आणि ७० आमदारांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे, खासदार अरविंद सावंत, युवा सेनेचे नेते वरूण देसाई, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह रोहित पवार तसेच इतर आमदारांनाही करोनाची बाधा झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माहितीनुसार, ७० आमदार आणि १५ मंत्री करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here