हिंगोली : कळमनुरी येथील औद्योगिक वसाहतीच्या कॉर्नर जवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथील शेख उमर शेख मोहम्मद ( १८ रा. नाईकवाडी मोहल्ला) व शेख मोहम्मद खाजा फैजान उमर फारूक ( २१ रा. आठवडी बाजार) हे दोघे त्यांच्या दुचाकी वाहनावर मंगळवारी रात्री रात्री बारा वाजण्याच्या सुमारास औद्योगिक वसाहतीकडून कळमनुरी शहराकडे येत होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
ST Strike Update : एसटीचे ५० कर्मचारी कामावर रूजू तर १२ जणांवर कठोर कारवाई
या अपघातातमध्ये दोन्ही तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच जमादार भडके, रमेश कुंदर्गे, जाधव, प्रशांत शिंदे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने वाहनासह पळ काढल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खरंच, करोना वाढतोय की सर्दी-तापाची साथ पसरली?, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here