हायलाइट्स:

  • राज्यात करोनाचा वाढता प्रादूर्भाव
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त केली चिंता
  • गर्दी टाळण्यासाठी पक्षाने घेतला मोठा निर्णय
  • नियोजित दौरे आणि कार्यक्रम केले रद्द

मुंबई: मुंबईसह राज्यात करण्यासाठी रुग्णांच्या वेगाने वाढणाऱ्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पक्षाचे मंत्री आणि नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झालेल्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. या महिन्यात पक्षाची होणारी सर्व नियोजित शिबिरे आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाच्या मंत्र्यांची आणि नेत्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर मलिक यांनी राज्यातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर बैठकीत चिंता व्यक्त केल्याचे सांगितले. गर्दी टाळण्यासाठी पक्षाचे सर्व नियोजित दौरे आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मंत्री किंवा नेत्यांनी गर्दी होईल असे कार्यक्रम घेऊ नयेत, असा निर्णय या बैठकीत झाल्याचे मलिक यांनी सांगितले. मात्र मंत्री आणि पालकमंत्री व संपर्कमंत्री त्या-त्या जिल्ह्यांत जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून माहिती घेतील. पक्षांतर्गत होणार्‍या निवडणुकीसाठी होणारी सदस्य नोंदणी कार्यक्रमाचीही चर्चा यावेळी झाली. शिवाय आगामी ज्या निवडणुका होणार आहेत, त्याची तयारी पक्षाने केली आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Corona in Mumbai : मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, BMC अधिकारी म्हणाले…

Corona in Maharashtra : विळखा घट्ट होतोय; महाराष्ट्रातील ७० आमदार, १५ मंत्र्यांना करोनाचा संसर्ग

ओबीसी आरक्षणावर राष्ट्रवादीची भूमिका

या बैठकीमध्ये आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, त्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे, ही पक्षाची भूमिका असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढण्याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आल्याचेही बैठकीत ठरले, असे मलिक यांनी सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत ही पक्षाची सुरुवातीपासून भूमिका आहे. तीच कायम राहील. त्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Omicron in Maharashtra : अॅलर्ट राहा, घाबरू नका, ओमिक्रॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी आली गुड न्यूज
Corona in Maharashtra: राज्यात करोनाचा कहर सुरूच; मुंबईतील आकडेवारीने चिंता वाढली, ‘ही’ आहे ताजी स्थिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here