हायलाइट्स:

  • ठाण्यातील १३ वर्षीय मुलीचे अपहरण
  • दिल्लीतून पोलिसांनी केली सुखरूप सुटका
  • एका फोन नंबरने तपासाला मिळाली दिशा
  • अपहरण करणारी तरूणी फरार

कल्पेश गोरडे | ठाणे : देहविक्री करण्यासाठी अपहरण (अपहरण) करण्यात आलेल्या एका १३ वर्षीय मुलीची ठाण्यातील नौपाडा पोलिसांनी शिताफीने सुटका केली. अपहरण झालेल्या मुलीनेही शक्कल लढवल्याने पोलिसांना तिची सुटका करण्यात यश मिळाले. अपहृत मुलीचे आईवडील ठाणे स्थानक परिसरात फुलाविक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे दोन दिवसांसाठी राहायला आलेल्या २० वर्षीय तरुणीनेच तिचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ही तरूणी फरार असून, ती दिल्लीतील रहिवासी आहे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिला लवकरच अटक करण्यात येईल, असा पोलिसांना विश्वास आहे.

ठाण्यातील प्रकाश बुटीया हे पत्नी, दोन मुले आणि दोन मुलींसोबत राहतात. बुटिया कुटुंबीय ठाण्यातील स्थानक परिसरात फुलांचा व्यवसाय करतात. हा व्यवसाय करत असताना ज्योती नावाची २० वर्षीय तरुणी त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी आली. आपल्याकडे गावी जाण्यासाठी पैसे नसून, मी काम शोधत असल्याचा बनाव तिने केला. त्यानंतर बुटीया कुटुंबीयांनी तिला आपल्याच घरी आश्रय दिला. दोन दिवसानंतर ज्योतीची बुटीया कुटुंबीयांसोबत चांगली ओळख झाली. त्यानंतर बुटीया कुटुंबीय आणि आजूबाजूच्या नागरिकांनी प्रत्येकी १०० रुपये जमा करून एक रक्कम ज्योतीला आपल्या घरी जाण्यासाठी जमा करून दिली. २९ डिसेंबर आपल्या घरी जाण्यासाठी निघाली आणि तिने मी ट्रेन पकडत असल्याचे सांगत बुटीया यांच्या घरातून निघाली. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बुटीया यांची १३ वर्षीय मुलगी तुलसी अचानक गायब झाली. मुलगी कुठेही सापडत नसल्याने बुटीया कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत बुटीया यांची १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून घेत तपासाला सुरुवात केली.

शिळा भात फेकून दिला म्हणून वकील सासूची शिक्षक सुनेला मारहाण
Bulli Bai app : ‘बुल्लीबाई’ प्रकरणात मुंबई पोलिसांचा कारवाईचा धडका, आता…

बुटीया कुटुंबीयातील १३ वर्षीय मुलगी गायब झाल्यानंतर नौपाडा पोलिसांनी ठाणे रेल्वे स्थानक आणि कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांच्या हाती निराशा आली. त्यावेळी पोलिसांनी स्थानक परिसरातील स्टॉल धारकांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एका स्टॉल धारकाकडून पोलिसांना एक २० वर्षीय तरुणी ही मुलीसोबत ट्रेनने दिल्लीच्या दिशेने गेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी दिल्ली पोलिसांना आणि रेल्वे पोलिसांना फोनद्वारे ही माहिती दिली. त्या मुलीचा शोध घेण्याची विनंती केली.

Bulli Bai app case : बुल्लीबाई प्रकरणात मोठी अपडेट, आता इंजिनीअर असलेल्या २१ वर्षीय आरोपीला…

पोलिसांची शोधमोहीम सुरु असताना १ जानेवारी रोजी मुलीच्या वडिलांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि त्याने त्यांची मुलगी दिल्ली येथील द्वारका येथे असल्याची माहिती देत मुलीने तुमचा नंबर देऊन फोन करण्यास सांगितले. तिच्यासोबतची मुलगी त्यावेळी स्वच्छतागृहात गेली होती, असे प्रकाश यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दिल्लीतील स्थानिक पोलिसांसोबत संपर्क साधत त्या मुलीच्या लोकेशनवर पाठवले आणि आपले पथक विमानाने दिल्लीला रवाना केले. पोलिसांनी बुटीया कुटुंबीयांना व्हिडिओ कॉल करून मुलीची ओळख पटल्यानंतर तिला विमानाने घरी आणून तिच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले.

धक्कादायक! मुंबईत गुंडांचा पोलिसांवर हल्ला, २ पोलिसांना चाकूने भोसकले

फोन आणि नवीन कपडे देण्याचे आमिष दाखवून नेले

१३ वर्षीय मुलीला पोलिसांनी विचारणा केली असता, तिने पोलिसांना सांगितले की, ज्योतीने मला फोन आणि नवीन कपडे देण्याचे आमिष दाखवून मला घेऊन गेली. त्यानंतर ज्योतीने तिला दिल्लीतील ज्य- ज्या ठिकाणी फिरवले त्या-त्या ठिकाणी पोलिसांनी तपास केला असता, द्वारका येथील दाभडी एरिया हा रेड लाइट एरिया असून ज्योतीने तिला देहविक्रीच्या व्यवसायात ढकलण्यासाठी अपहरण केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. आरोपी ज्योतीला दिल्लीतील सर्व ठिकाणे माहीत आहेत. त्यामुळे ती दिल्लीतील रहिवासी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

​Raigad crime news : लज्जास्पद! विवाहित महिलेवर पोलिसाने केला बलात्कार; पती आणि मुलांना ठार मारण्याची धमकी द्यायचा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here