सध्या आपल्या राज्यासह देशात व जगात करोनाच्या विषाणूने थैमान घातले असून या विषाणूमुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोक या करोना विषाणूमुळे त्रस्त असून काही जणांना जीव गमवावा लागला आहे. ही स्थिती लक्षात घेऊन शिक्षकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासन प्रभावी उपाययोजना करत असून त्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षक एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे तांबारे यांनी सांगीतले . या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
राज्यातील सर्व खाजगी अनुदान प्राप्त प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १ दिवसाचे वेतन हे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये घ्यावे यासाठी आज महासंघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व शिक्षण व वित्त सचिव यांना निवेदन ई-मेलद्वारे पाठविण्यात आले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times