हायलाइट्स:

  • राज्यातील सर्व विद्यापीठे, संलग्न कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
  • या कालावधीत शिक्षण ऑनलाइन पद्धतीने
  • परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होणार
  • सर्व विद्यापीठे वसतिगृहेही या कालावधीत बंद राहतील
  • वाढत्या करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

राज्यातील सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न महाविद्यालयांचे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहेत. तसेच या सर्व विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही या निर्णयाप्रत आलो आहोत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

१३ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य सरकारने महाविद्यालये ऑफलाइन सुरू करण्याच निर्णय घेतला. दोन लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्याची परवानगी दिली. परंतु गेल्या काही दिवसांपासून करोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो आहे. त्यामुळे हे निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये, विद्यापीठांना पुढील सूचना दिल्या आहेत –

– १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व कॉलेजे बंद राहतील.
– सर्व अकृषी विद्यापीठांसोबत खासगी विद्यापीठ, महाविद्यालयांनाही हा निर्णय लागू राहील.
– या कालावधीत शिक्षण ऑनलाइन होईल.
– काही कारणांमुळे परीक्षा देऊ शकले नाही तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कुलगुरुंनी त्यांची सोय करावी.
– गोंडवाना, नांदेड, जळगाव विद्यापीठांत नेट जोडणीची अडचण असल्याने स्थानिक परिस्थिती पाहून ऑफलाइन परीक्षा घ्याव्यात.
– कॉलेज, विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाइन सुरू कराव्यात.
– सर्व विद्यापीठे वसतिगृहेही या कालावधीत बंद राहतील.
– मात्र परदेशी विद्यार्थ्यांची सर्व काळजी घेऊन वसतिगृहात राहू शकणार आहेत.
– विद्यापीठे तसेच कॉलेज विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नसतील तर त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावी.
– पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचेही लसीकरण करावे.
– दहावीच्या चित्रकला परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होणार. या परीक्षा उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत घेण्यात येतात.
– शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कॉलेजमध्ये, विद्यापीठांमध्ये ५० टक्के उपस्थिती असेल. ही उपस्थिती चक्राकार पद्धतीने राबवणे अनिवार्य असेल.

IIT Kharagpur मध्ये ६० जण करोना पॉझिटिव्ह, दीड वर्षानंतर सुरु झालेले ऑफलाइन वर्ग १५ दिवसांत बंद
IIT मुंबईलाही करोनाचा फटका;१०० हून अधिक संक्रमित, कॅम्पसमध्ये आणले निर्बंध
कशी केली CAT परीक्षा क्रॅक; Topper चिराग गुप्ताने सांगितलं यशाचं रहस्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here