हायलाइट्स:

  • डोंबिवलीतून ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण
  • नालासोपारा येथील एका हॉटेलात ठेवले होते डांबून
  • ५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी केले होते अपहरण
  • पोलिसांनी हॉटेलवर झडती घेत तिघांना केली अटक

डोंबिवली: पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या ६५ वर्षीय वृद्धाची मानपाडा पोलिसांनी नालासोपारा येथील एका हॉटेलातून सुटका केली. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हे तिन्हीही आरोपी मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत.

मानपाडा पोलीस ठाण्यात १ जानेवारी रोजी फिर्यादी खकुमनी सुभाषिश बॅनर्जी यांनी पती सुभाषिश बॅनर्जी (वय ६५) यांचे पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी मनजीत कुमार यादव आणि त्याच्या दोन साथीदारांनी जबरदस्तीने अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती. याबाबत मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आणि सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सानप यांनी तक्रार दाखल करून घेतली आणि आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला. आरोपींच्या ठावठिकाण्याबाबत काहीही माहिती तक्रारदारांकडे नव्हती. डोंबिवली एसीपी जय मोरे आणि मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय सानप, सुनील तारमळे, प्रशांत वानखेडे, अशोक कोकडे, सुशांत तांबे, संतोष वायकर, तारांचद सोनवणे आणि चंद्रकांत सोनवणे यांचे पथक स्थापन केले. या आरोपींचा शोध सुरू केला.

Dombivli crime : ‘ते’ दोघे मुळचे उत्तर प्रदेशचे, कल्याण-डोंबिवलीत करायचे हे धक्कादायक कृत्य…
Thane Crime News : देहविक्रीसाठी २० वर्षीय तरूणीने केले १३ वर्षीय मुलीचे अपहरण, एका फोन नंबरने…

फिर्यादीच्या मुलीकडील मोबाइलवर फोन करून आरोपींनी मोबाइलवरून धनादेश पाठवून द्या, नाहीतर आमच्या खात्यावर पाच लाख रुपये ट्रान्सफर करा, अन्यथा तुझ्या वडिलांच्या जीवाचे बरेवाईट करू, अशी धमकी तिला दिली. दरम्यान पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीचे बँक डिटेल्स मिळवले आणि आरोपी मनजित यादव हा बेलापूर येथे शिपिंग एजंट म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला असता, ते नालासोपाऱ्यातील गोराई नाका येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी परिसरातील सर्व लॉज, हॉटेल व चाळींमध्ये आरोपींचा शोध सुरू केला. त्यावेळी एका हॉटेलातील रजिस्टर चेक केले असता, त्यात अपहृत सुभाषिश बॅनर्जी यांच्या वर्णनाची व्यक्ती आणि त्यांच्यासोबत आणखी तीन जण तेथे वास्तव्यास असल्याचे समजले. त्यावरून हॉटेलची तपासणी पोलिसांनी केली. पोलिसांनी हॉटेलच्या खोलीत प्रवेश करून तिन्ही आरोपींना पकडले आणि त्यांच्या तावडीतून बॅनर्जी यांची सुटका केली. मनजीत विजयनाथ यादव (वय २५), धनंजय श्रीराम यादव (वय २७), सोमप्रकाश नंदालाल यादव (वय २९ वर्षे) अशी या आरोपींची नावे आहेत.

शिळा भात फेकून दिला म्हणून वकील सासूची शिक्षक सुनेला मारहाण
Bulli Bai app case : बुल्लीबाई प्रकरणात मोठी अपडेट, आता इंजिनीअर असलेल्या २१ वर्षीय आरोपीला…

1 COMMENT

  1. Looking at this article, I miss the time when I didn’t wear a mask. totosite Hopefully this corona will end soon. My blog is a blog that mainly posts pictures of daily life before Corona and landscapes at that time. If you want to remember that time again, please visit us.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here