पुणे : वारजे माळवाडी परिसरातील काळूबाई मंदिरातील देवीच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचा मुखवटा, दोन दानपेटी असा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ()

याबाबत कमलाकर गलांडे (वय ५२, रा. विठ्ठलनगर, वारजे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी परिसरात अखिल विठ्ठलनगर नवरात्र उत्सव यांच्या मालकीचे काळूबाई व दत्त मंदिर आहे. त्या मंदिराची देखभाल ट्रस्ट आणि तक्रारदार यांच्या कुटुंबियांच्या वतीने केली जाते. अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी पहाटे मंदिराच्या सरकत्या दरवाज्याचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर देवीच्या गाभाऱ्यात जाऊन देवीचा चांदीचा मुखवटा, एक सोन्याचे मंगळसूत्र, दोन पत्र्याच्या दानपेट्या असा ऐवज चोरून नेला.

दरम्यान, सकाळी पुजारी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. मंदिरातील दानपेटीत नेमके किती पैसे होते हे माहिती नाही. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस तपास करत आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here