हायलाइट्स:
- करोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ आजही कायम
- तब्बल २६ हजार ५३८ नवीन रुग्णांचं निदान
- ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली
राज्यात आज ५ हजार ३३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत राज्यात एकूण ६५,२४,२४७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परलते आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६.५५ टक्के एवढं झालं आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९७,७७,००७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,५७,०३२ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,१३,७५८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर १३६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज ओमिक्रॉनचे किती रुग्ण आढळले?
करोनाबाधितांची संख्या वाढत असताना ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. राज्यात आज १४४ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत.
ओमिक्रॉनचे कुठे किती रुग्ण आढळले?
राजधानी मुंबईत सर्वाधिक १०० ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल नागपुरात ११, ठाणे मनपा आणि पुणे मनपामध्ये ७, पिंपरी चिंचवडमध्ये ६, कोल्हापूरमध्ये ५, अमरावती, उल्हासनगर आणि भिवंडी निजामपूर मनपामध्ये प्रत्येकी २, पनवेल आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी १ असे रुग्ण आढळले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७९७ ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत.
Your article has answered the question I was wondering about! I would like to write a thesis on this subject, but I would like you to give your opinion once 😀 casinocommunity