औरंगाबाद : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील आंबा गावातील एका ३७ वर्षीय कोरोना रुग्ण फरार झाल्याने मोठी खळबळ उडाली. तर आरोग्य प्रशासन आणि स्थानिक प्रशासन या व्यक्तीला शोधण्यासाठी कामाला लागले होते. पण तरीही रुग्ण सापडत नसल्याने आरोग्य विभागाने गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर २४ तासांनी हा रुग्ण स्वतःहुन येऊन हजर झाला.

अधिक माहिती अशी की, कन्नड तालुक्यातील वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ३ जानेवारी रोजी आंबा गावात फिरत्या रुग्णवाहिकेद्वारे गावातील अनेक रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. दरम्यान ४ जानेवारीला आलेल्या अहवालानुसार एका ३७ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यास पुढील उपचार घेण्यासाठी डॉक्टरांचे पथक हजर झाले. मात्र, ‘मला कोरोना झाला नाही. माझी पुन्हा तपासणी करा’, असे म्हणून उपचार घेण्यासाठी नकार देऊन तो रुग्ण फरार झाला.

औरंगाबाद जिल्ह्यात प्रशासनाकडून नवीन निर्बंध लागू, वाचा काय आहेत नवे नियम?
या सर्व प्रकाराने स्थानिक प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. बराच शोध घेऊन सुध्दा हा रुग्ण सापडत नसल्याने तालुका आरोग्य अधिकारी बाळकृष्ण लांजेवार यांनी रुग्ण जर हजर झाला नाही तर आम्ही कायदेशीर गुन्हा नोंद करू, अशी भूमिका घेतल्याने रुग्ण अखेर दुसऱ्या दिवशी रात्री साडेआठ वाजता ग्रामीण रुग्णालयात हजर झाल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

‘या’ जिल्ह्याने चिंता वाढवली, फक्त ५ दिवसांत करोना रुग्णांचा धक्कादायक आकडा समोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here