हायलाइट्स:

  • माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेयर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा मित्र
  • ब्रिटनमधल्या ‘लेबर पार्टी’चा माजी नेता
  • मूळ पाकिस्तानी लॉर्ड नझीर अहमद लैंगिक शोषण प्रकरणात दोषी

लंडन, यूके:

पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांचा मित्र आणि ब्रिटनचा वादग्रस्त नेता लॉर्ड नझीर अहमद हा दोन अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात दोषी आढळलाय. बुधवारी १९७० च्या दशकात एका मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तसंच एका मुलीवर दोन वेळा बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी लॉर्ड नझीर दोषी आढळला आहे.

पाकिस्तानात जन्मलेला लॉर्ड नझीर अहमद काश्मीरबाबत अनेकदा भारताविरोधात जहरी विधानं करण्यासाठी चर्चेत आला होता. एवढंच नाही तर एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निधनाची कामना करण्यासाठीही तो वादात अडकला होता.

काय आहे प्रकरण?

ब्रिटनमधल्या ‘लेबर पार्टी’चा माजी नेता लॉर्ड नझीर आणि त्याचे दोन भाऊ मोहम्मद फारूख आणि मोहम्मद तारिक यांच्यावर करण्यात आलेले आरोप खरे असल्याचं न्यायालयात स्पष्ट झालंय. नझीरचे दोन्ही भाऊ वार्धक्यातील त्रासांमुळे खटल्याच्या सुनावणीसाठी हजर राहण्यास अपात्र ठरले.

१९७३ आणि १९७४ साली नझीर अहमदनं आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेनं न्यायालयासमोर केला होता. उल्लेखनीय म्हणजे, त्यावेळी नझीर हादेखील १६-१७ वर्षांचा होता आणि पीडित मुलगी त्याच्यापेक्षा वयानं लहान होती. १९७२ साली एका मुलासोबत गंभीर लैंगिक शोषण आणि अप्राकृतिक मैथुन प्रकरणातही नझीर दोषी आढळला आहे. ब्रिटिश न्यायालय ४ फेब्रुवारी रोजी या प्रकरणात दोषींविरुद्ध शिक्षा सुनावणार आहे.

गॅसच्या वाढत्या किंमतींनी सत्ता उलथली! ‘या’ देशाच्या पंतप्रधानांचा राजीनामा
Watch Video: हेलिकॉप्टर उडवण्याची ‘तालिबानी’ पद्धत पाहिलीत का?
पाकिस्तान पंतप्रधानांचा मित्र

माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेयर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा मित्र म्हणवणारा लॉर्ड नझीर अहमद ब्रिटीश संसदेच्या वरिष्ठ सभागृह ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’चा आजीवन सदस्य म्हणून नियुक्त झालेला पहिले मुस्लीम खासदार ठरला होता.

‘पुढचा नंबर मोदींचा…’

पाकिस्तानचं समर्थन करताना लॉर्ड नझीर अहमद यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘भाजपवर जादूटोणा, तंत्र-मंत्राच्या विरोधकांच्या दाव्या दरम्यान माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री बाबू लाल गौर, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं गेल्या वर्षभरात निधन झालं. पुढचा नंबर नरेंद्र मोदींचा आहे’ असं वादग्रस्त ट्विट नझीर अहमद यानं केलं होतं.

Artificial Sun: चीनच्या ‘कृत्रिम सूर्याचा’ ऊर्जा निर्मितीचा नवा रेकॉर्ड; जगाच्या चिंतेत भर!
‘अॅस्ट्रॉईड नाही या तर एलियन्सनं पृथ्वीवर धाडलेल्या मिसाईल्स’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here