हायलाइट्स:
- मुंबईतून जीएसटी जॉइंट कमिश्नर बेपत्ता
- कार्यालयातून लंचनंतर बाहेर पडले ते आलेच नाहीत
- मुंबई पोलिसांनी केला तपास सुरू
- कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
जीएसटीचे जॉइंट कमिश्नर बेपत्ता झाल्यानंतर खळबळ उडाली असून, याबाबत कार्यालयातील सचिवांनी ही माहिती बुधवारी दिली. पोलिसांनी सांगितले की, जॉइंट कमिश्नर माझगाव परिसरातील आपल्या कार्यालयातून बेपत्ता झाले आहेत. दुपारी जेवण केल्यानंतर ते फेरफटका मारण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडले होते. मात्र, ते पुन्हा कार्यालयात परतले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
संध्याकाळपर्यंत न परतल्याने उडाली खळबळ
सहकाऱ्यांनी सांगितले की, बेपत्ता अधिकारी जेवण केल्यानंतर कुणाला तरी भेटायला गेले असतील, असा विचार त्यांनी केला. मात्र, संध्याकाळपर्यंत ते कार्यालयात परतले नाहीत. त्यानंतर संशय येऊ लागला. यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
पंतप्रधानाच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेबाबत चूक, राष्ट्रवादीने मांडली भूमिका
पोलीस तपास सुरू
पोलिसांच्या विनंतीनुसार, बेपत्ता अधिकाऱ्याचे नाव अद्याप उघड केलेले नाही. पोलिसांनी सांगितले की, अधिकाऱ्याच्या मोबाइलवर कॉल केल्यानंतर फोन कार्यालयातच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अधिकाऱ्याच्या मोबाइलवरील कॉल डिटेल्स काढले असून, तपास सुरू केला आहे.
नातेवाइकांकडे चौकशी
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्याचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. बेपत्ता अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांनी नातेवाइकांकडेही चौकशी केली आहे. मात्र, ते कुणाला भेटायला गेले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या तरी अधिकाऱ्याचे अपहरण झाले का किंवा ते स्वतःहूनच कुठे निघून गेले आहेत याबाबत काही स्पष्ट झालेले नाही. सीडीआरच्या तपासानंतर आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतरच याबाबत अधिक माहिती स्पष्ट होईल.