‘डेली मेल’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. अमेरिकेत वेगाने फैलावत आहे. येत्या काळातही अशीच परिस्थिती राहिल्यास अमेरिकेत मृतांचा आकडा येत्या चार महिन्यात ८१ हजारापर्यंत जाऊ शकतो, अशी भीती आयएचएमईच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यास अपयश आल्यास मृतांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढेल. एप्रिल आणि मे महिन्यात दररोज किमान २३०० करोनाबाधितांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
वाचा: वाचा:
करोना संसर्गाचे नवे केंद्र अमेरिका झाले असल्याचे चित्र आहे. वेगाने फैलावलेल्या करोनामुळे महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील दोषही समोर आले आहे. न्यूयॉर्कमध्येच आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्यास सांगितले आहेत.
आणखी वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times