लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेले आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस झालेल्या व्यक्तींनाच प्रकल्पात पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. वैद्यकीय कारणास्तव लस घेण्याची मुभा नसलेल्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. प्रवेशद्वारावर कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक राहणार आहे. प्रवेशद्वारासमोर जिप्सी वाहनाकरिता खुणा करण्यात येतील, असे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी स्पष्ट केले आहे.
हे असतील नियम…
– प्रवेशद्वारांवर गर्दी होऊ नये
– दोन्ही वाहनांमध्ये किमान दोन व अधिकाधिक १५ फूट अंतर
– वाहनांच्या प्रचलित वेळेच्या अर्धा तास आधी प्रवेश
-अर्धा तास आधी बाहेर निघण्याची मुभा
– प्रवेशाकरिता ‘स्लॉट’ची आखणी
– -एकाच कुटुंबातील सहा पर्यटकांना सफारी करता येणार
– इतरांसाठी प्रती जिप्सी चारची मर्यादा
-कोअर क्षेत्रातील पर्यटन हे मंगळवार व बफर क्षेत्रातील बुधवारी बंद
-तर पर्यटकांवर कारवाई होणार
सफारीदरम्यान मास्क घालणे बंधनकारक राहील. उल्लंघन करणाऱ्याला एक हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. यासोबतच सफारीदरम्यान वाहनांची गर्दी रोखण्यात यावी, उल्लंघन केल्यास संबंधित जिप्सीचालक आणि पर्यटकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.