बेस्टच्या करोनाबाधित ६६ कामगारांपैकी ६० टक्के कर्मचारी बेस्टने आगारामध्ये केलेल्या करोना तपासणीत आढळून आले. ६० करोनाबाधित कामगारांमध्ये परिवहन विभागातील बस चालक, वाहक विद्युत विभागातील कामगार व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या ऑक्टोबरपर्यंत बेस्टमधील ३३ हजार अधिकारी-कामगारांपैकी ३,५६१ कामगारांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावरील उपचारानंतर ३,४३५ अधिकारी, कामगारांनी करोनावर मात केली होती. तर ९७ कामगारांचा मृत्यू ओढविला होता.
९७ मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रु. आर्थिक मदत करण्यात आली आहे. तर ७८ मृत अधिकारी, कामगारांच्या कुटुंबीयांतील वारसांना नोकरीत सामावून घेतले आहे. त्यासाठी पालिकेने बेस्ट उपक्रमास ५० कोटी रु. आर्थिक सहाय्य दिले आहे.