घाटकोपर : मध्यरात्रीनंतर बार उघडून मद्य देण्यास नकार दिला म्हणून दोन तरूणांनी बारचीच तोडफोड केल्याची घटना घाटकोपरच्या कामराज नगरमध्ये घडली. बारमधील वेटर, कर्मचारी यांना मारहाण करून या दोघांनी वेटरचे पैसेही पळविले. याप्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घाटकोपर पूर्वेकडील कामराज नगरमध्ये पूजा बार असून रोजच्याप्रमाणे रविवारी रात्री १२ वाजता व्यवस्थापकाने बार बंद केला. त्यानंतर बारमधील साफसफाई करून वेटर तसेच इतर कर्मचारी आराम करीत असताना मध्यरात्रीनंतर दोन तरूणांनी बारचा दरवाजा ठोठावला आणि ते मद्याची मागणी करू लागले. सीसीटीव्हीतून पाहिले असता बारमध्ये नेहमी येणारे आणि कामराज नगरमध्येच राहणारे दोन तरूण असल्याचे दिसले. बार व्यवस्थापकाने मद्य देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या या दोन तरूणांनी बारच्या प्रवेशद्वारावरील बोर्डची तोडफोड केली. त्यानंतर दोघे बारच्या मागील दरवाजावर आले. या ठिकाणी त्यांनी ग्रील तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांची समजूत काढण्यासाठी दरवाजा उघडला असता दोघेही जबरदस्तीने आत घुसले. त्यांनी वेटर आणि कर्मचारी यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. एका वेटरच्या खिशातील पगाराचे १२ हजार रूपये काढून घेतले.

GST Officer Missing : धक्कादायक! जीएसटी जॉइंट कमिश्नर मुंबईतून बेपत्ता; ऑफिसमधून लंचनंतर बाहेर पडले ते….
Dombivli Kidnapping : अपहरण करून ‘त्यांना’ हॉटेलमध्ये डांबले होते, पोलीस थेट खोलीत घुसले अन्…

वेटर आणि कर्मचारी यांनी याबाबतची माहीती बारमालकाला दिली. त्यानंतर बार व्यवस्थापकाने याबाबत पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. दोन तरूणांनी बारमध्ये घातलेला धुडगूस सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्यानुसार तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Dombivli crime : ‘ते’ दोघे मुळचे उत्तर प्रदेशचे, कल्याण-डोंबिवलीत करायचे हे धक्कादायक कृत्य…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here