हायलाइट्स:

  • नेतर्डेत विहिरीत पडलेल्या सांबराला दिले जीवदान
  • सावंतवाडी वनविभागाच्या पथकाचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी
  • कुत्र्यांनी पाठलाग केल्यानंतर सांबर विहिरीत पडले होते
  • ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने सांबराला काढले बाहेर

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील सावंतवाडी बांदा नेतर्डे-लिंगाचामळा येथे कुत्र्याने पाठलाग केल्यानंतर बचावासाठी जीवाच्या आकांताने पळालेले सांबर थेट २० फूट खोल विहिरीत पडले. वनविभागाच्या बचाव पथकाने शर्थीच्या प्रयत्नानंतर या सांबराला बाहेर काढून जीवदान दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी बांदा नेतर्डे- लिंगाचामळा येथे ही घटना घडली. भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केल्यानंत बचावासाठी सांबर पळाले. मात्र, तिथेच असलेल्या एका २० फूट खोल विहिरीत ते जाऊन पडले. बराच वेळ बाहेर निघण्यासाठी सांबराची धडपड सुरू होती. ही बाब स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात आली. विहिरीत पडलेल्या सांबराला वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी मदत सुरू केली. काही ग्रामस्थांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली.

वाळूशिल्प साकारून सिंधुताई सपकाळ यांना अनोखी मानवंदना

बापरे! पर्यटकांची स्कूल बस मालवण समुद्रात अडकली आणि…

विहिरीत सांबर अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सांबराला यशस्वीपणे विहिरीतून बाहेर काढले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांमुळे जीवदान मिळालेल्या या सांबराला नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

ही बचाव मोहीम सावंतवाडी उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर, बांदा वनपाल अनिल मेस्त्री, वनरक्षक संतोष देसाई, संतोष मोरे, शशिकांत देसाई यांच्या पथकाने केली. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी विहिरींना कठडे बांधून घ्यावेत किंवा त्यावर लोखंडी जाळी बसवावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले.

Sindhudurg News : पेट्रोल पंपावर चोरी करून ‘ते’ मुंबईकडे जात होते, करूळ चेकनाक्यावर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here