म्हाडा परीक्षेचे वेळापत्रक 2021 – 2022 : पेपरफुटी प्रकरणामुळे गतवर्षी होणाऱ्या म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुधारीत वेळापत्रकानुसार ही परीक्षा 29 जानेवारी रोजी होणार होती. परंतु, एमपीएससीच्या पोलीस निरिक्षक पदासाठीची परीक्षाही याच दिवशी होणार आहे. त्यामुळे म्हाडा परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. म्हाडा परीक्षेचं सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. त्यानुसार, 7, 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी म्हाडाच्या परीक्षा होणार आहेत. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. (MHADA Exam Time Table)
म्हाडा प्राधिकरणाची क्लस्टर 6 मधील सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक या संवर्गासाठी 29 आणि 30 जानेवारी या दिवशी सहा सत्रांमध्ये परीक्षा होणार होती. परंतु, एमपीएससी आणि म्हाडा प्राधिकरणाच्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने म्हाडा ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
मागच्या वर्षी घेण्यात येणाऱ्या म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर सुधारीत वेळापत्रकानुसार ही परीक्षा 29 जानेवारी 2022 रोजी होणार होती. परंतु एमपीएससीच्या पोलीस निरिक्षक पदासाठीची परीक्षाही याच दिवशी म्हणजे 29 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जाणार होत्या. यामुळे विद्यार्थी गोंधळात पडले होते. त्यामुळेच आता म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार म्हाडाच्या परीक्षा 7, 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी होणार आहेत.
पाहा वेळापत्रक :
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :