म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : चेंबूर भागात राहणाऱ्या एका तरुणीने मंगळवारी दुपारी वाशी खाडी पुलावरून उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने वेळीच या तरुणीला खाडीतून बाहेर काढल्याने ती बचावली आहे.

या तरुणीच्या प्रियकराने तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याने या तरुणीनेही निराशेच्या भरात वाशी खाडी पुलावरून उडी टाकल्याचे तपासात आढळून आले आहे. सध्या या तरुणीवर महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही तरुणी चेंबूर भागात राहावयास असून, त्याच भागात राहणाऱ्या एका तरुणाचे या तरुणीवर प्रेम होते. त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. मात्र अल्पवयीन असल्याने तिने लग्नास नकार दिला होता. तसेच १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न करण्याबाबत तरुणीने प्रियकराला सांगितले होते. त्यानंतर प्रियकराने ३ दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे या तरुणीलाही नैराश्याने ग्रासले होते.

GST Officer Missing : धक्कादायक! जीएसटी जॉइंट कमिश्नर मुंबईतून बेपत्ता; ऑफिसमधून लंचनंतर बाहेर पडले ते….
Dombivli Kidnapping : अपहरण करून ‘त्यांना’ हॉटेलमध्ये डांबले होते, पोलीस थेट खोलीत घुसले अन्…

नैराश्यातच तिने मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या करण्यासाठी वाशी खाडी पूल गाठला आणि त्याच्यावरून उडी टाकली. ही बाब काही नागरिकांनी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी वाशी खाडी पुलावर धाव घेतली. त्यानंतर पोलीस हवालदार नाईकवाडी, घुले, दराडे, वीरकर यांनी स्थानिक मच्छिमार महेश सुतार यांच्या मदतीने, खाडीत पडलेल्या तरुणीला बोटीच्या साहाय्याने बाहेर काढले. पोलीस निरीक्षक यमगर यांनी तिला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे.

Sindhudurg News : सांबराचा कुत्र्यांनी पाठलाग केला, तावडीतून निसटला; पण २० फूट खोल…
२४ जानेवारीपासून विमानतळाचे काम बंद पाडणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here