भाजपच्या नेत्यांनी रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी यांची उपमा दिली असेल तर त्या खूपच नशीबवान आहेत. राबडीदेवी या चूल, मूल आणि घर सांभाळणारी स्त्री होती. बरं झालं, भाजपवाल्यांनी रश्मी ठाकरे यांना फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही.

बरं झालं, भाजपवाल्यांनी रश्मी ठाकरे यांना फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाहीतर लोकांसमोर रश्मी ठाकरे यांची प्रतिमा ‘डान्सिंग डॉल’सारखी गेली असती.
हायलाइट्स:
- डबक्यातील लोकांनी दुसऱ्यांवर शिंतोडे उडवू नये
- तुम्ही काय आहात, भाजपमध्ये कोण काय आहे त्याविषयी आम्हाला सर्व माहिती आहे
भाजपच्या नेत्यांनी रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी यांची उपमा दिली असेल तर त्या खूपच नशीबवान आहेत. राबडीदेवी या चूल, मूल आणि घर सांभाळणारी स्त्री होती. बरं झालं, भाजपवाल्यांनी रश्मी ठाकरे यांना फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाहीतर लोकांसमोर रश्मी ठाकरे यांची प्रतिमा ‘डान्सिंग डॉल’सारखी गेली असती. राबडीदेवींची उपमा दिली जाते याचा अर्थ रश्मी ठाकरे यांची प्रतिमा तितकीही वाईट नाही. तसेच भाजपवाल्यांनी त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने काय गुण उधळले, हेदेखील ट्विट करुन सांगावे. मुख्यमंत्र्याच्या बायकांना अशाप्रकारे वादात ओढणे योग्य नाही. रश्मी ठाकरे यांना तुम्ही विनाकारण राजकीय वादात का ओढत आहात? भाजपच्या सेलला अक्कल राहिली नाही हे लक्षात येतं. ते डबक्यात आहेत. कमळ हे डबक्यात उगवतं. डबक्यातील लोकांनी दुसऱ्यांवर शिंतोडे उडवू नये. कारण तुम्ही डबक्यात आहात. तुम्ही काय आहात, भाजपमध्ये कोण काय आहे त्याविषयी आम्हाला सर्व माहिती आहे. कोणत्याही नेत्याच्या पत्नीवर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा, असा सल्ला विद्या चव्हाण यांनी दिला.
गजारियांच्या वकिलांची शिवसेनेला वॉर्निंग
बीकेसी कार्यालयात सायबर पोलीस सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांच्याकडून जितेन गजारिया यांचा जबाब नोंदवण्यात आला. यावेळी सायबर सेलच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तर जितेन गजारिया (जितेन गजरिया) यांच्या वकिलांनी त्यांच्या ट्विटचे पूर्णपणे समर्थन केले. तसेच शिवसेना सत्तेचा गैरवापर करुन पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार आज आहे, उद्या नसेल. उद्या आमचं सरकार आलं तर कायद्याच्या चौकटीत राहून कशी कारवाई करायची, हे आम्हालाही माहिती असल्याचा इशारा गजारिया यांच्या वकिलांनी शिवसेनेला दिला.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून