हायलाइट्स:

  • करोनाची लस घेतली असेल तरच घेता येणार भेट
  • जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतला कठोर निर्णय
  • निर्णयाबाबत जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया

जळगाव : राज्यभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत आहे. दैनंदिन रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याने प्रशासनही चिंतेत आहे. अशातच जळगावमधील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी कठोर निर्बंध लादले आहेत. (जळगाव कोरोना अपडेट्स)

करोनाच्या लसीचे दोन डोस घेतले असतील तरंच नागरिकांना जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटता येणार आहे. विशेष म्हणजे लस घेतलीच नसेल तर जिल्हा रूग्णालयाच्या आवारातही फिरता येणार नाही. डॉ. नागोराव चव्हाण यांनी घेतलेल्या या निर्णयाबाबत जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

दरम्यान, भेटण्यासाठी आलेल्यांनी जर लस घेतली नसेल तर त्यांना याच ठिकाणी लस देण्याचीही व्यवस्था जिल्हा शल्यचिकित्सकांकडून करण्यात आली आहे.

कालीचरणचा तुरुंगातील मुक्काम वाढला; न्यायालयीन कोठडीत रवानगी!

जिल्ह्यात वाढला करोनाचा प्रादुर्भाव

जिल्ह्यात ऑगस्टनंतर दुसऱ्या संसर्गाच्या लाटेतील रूग्ण संख्येची साखळी खंडीत होऊन जवळजवळ जिल्हा संसर्गमुक्त होण्याच्या मार्गावर पोहचला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत पुन्हा रुग्णवाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात करोना संसर्ग नियंत्रणात येत असतानाच जिल्हा बँकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनतर पुन्हा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून संसर्गबाधित रूग्णसंख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे दिसून आहे.

परदेशातून आलेल्या ११४ नागरिकांवर नजर

डिसेंबर महिन्यात परदेशातून प्रवास करून आलेले १२४ नागरिक शहरात दाखल झाले आहेत. त्यापैकी ११४ जणांशी प्रशासनाकडून संपर्क करण्यात आला आहे, तर १० जणांचा संपर्क झालेला नाही. ११४ नागरिकांपैकी बहुतांश नागरिकांचा १४ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी संपत आला आहे. यातील एकही नागरिकाचा रूग्ण तपासणी अहवाल पॉझिटिव्ह नाही. मात्र, प्रशासनाकडून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे.

लसीकरणाला गती

संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ७५ टक्के तर दुसऱ्या टप्प्यातील ३० टक्क्यांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झालं आहे. सोमवार ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलामुलींचे संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण केलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here