औरंगाबाद : एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीचे प्रकरण न्यायालयात असून यासाठी समितीची स्थापना केली आहे. ही समिती १९ जानेवारीपर्यंत अहवाल सादर करणार आहे. दरम्यान, आपल्या मागण्यासाठी अजूनही अनेक कर्मचारी आंदोलन करीत आहेत. आंदोलनात साठ दिवस राहिल्यानंतर आंदोलनावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. दोन महिन्यांपासून पगार नाही. तसेच बँकेतून कर्ज बंद असल्याने कर्मचाऱ्यांना चांगला फटका सहन करावा लागत आहे.

औरंगाबाद विभागात सात नोव्हेंबरपासून एसटीचे कर्मचारी आंदोलनावर आहेत. सात नोव्हेंबरपूर्वी सिडको आणि पैठण आगारातील कर्मचारी आंदोलनावर होते. आंदोलनामुळे दोन महिन्यांपासून वेतन बंद आहे. तसेच बँकेतून परत कर्ज काढण्यातही अडचण येत आहे. यामुळे घर खर्च चालविणे आता कठीण होत आहे. आंदोलनावर असलेल्या कर्मचांऱ्यांमध्ये वाहक आणि चालकांची संख्या अधिक आहे. एसटी चालकांमधील काही जण खासगी वाहने तसेच ट्रॅव्हल्स बसमधुन प्रवासी वाहतूक करून आपले घर चालवित असल्याची माहिती काही आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली. तसेच यांत्रिकी विभागातील आंदोलनावर असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण हे कर्तव्यावर हजर झालेले आहेत. काही जण अजूनही आंदोलनावर ठाम आहेत.

वीजबिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणाकडून मोठी कारवाई, नागरिकांमध्ये गोंधळ
यांत्रिकी विभागातील आंदोलनावर असलेले काही कर्मचारी छोटी मोठी कामे करीत आहेत. तसेच काही कर्मचारी शेती पाहत आहेत. काही नवीन कर्मचाऱ्यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला असून नवीन नोकरीच्या शोधातही आहेत, अशी माहिती समोर आलेली आहे. अनेक कामगारांना सध्या आर्थिक अडचण निर्माण होत आहे. पाल्यांच्या शुल्कासह काही जणांना घराचे भाडे देणेही अवघड बनलेले आहे. शासनाकडून विलिनीकरणाबाबत अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने हे कर्मचारी १९ जानेवारीपर्यंत संपावर राहतील अशीही माहिती आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिली.

दोन महिन्यांचे रेशन वाटण्याचे नियोजन

दरम्यान, एसटी विभागात आंदोलनावर असलेल्या गरजू आंदोलन करणाऱ्यांना आगामी काही दिवसांत दोन महिन्यांचे रेशन वाटण्याचे नियोजन आंदोलनावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी केले आहे. आगामी आठवड्यात हे कार्यक्रम घेण्याचे नियोजित करण्यात आले असल्याची माहिती एसटी कर्मचाऱ्यांनी दिली.

अशीही मदत

गेल्या साठ दिवसांपासून आंदोलनावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या काही आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आंदोलनात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांनी एक दुसऱ्याकडून आर्थिक मदत देण्याचे सुरू केले आहे. याशिवाय प्रत्येकाकडून १०० ते २०० रूपये असे जमा करून अशा कर्मचाऱ्यांना मदत केली जात असल्याचीही माहिती आंदोलनावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिली.

Bhagwat Karad: अन् केंद्रीय मंत्री भागवत कराड पोहचले ‘त्या’ उड्डाणपूलावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here