नागपूर : शहर पोलीस दलाच्या भरतीत मूळ उमेदवारांऐवजी अन्य युवकांनी परीक्षा दिली. भरती प्रक्रियेतील हा घोळ समोर आल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन उमेदवारांना अटक केली.

जयपाल कारभारी कंकरवाल आणि अर्जुन सुलाने (दोन्ही रा. वैजापूर, औरंगाबाद) अशी अटकेतील युवकांची नावे आहेत. या प्रकरणी मिथुन गबरुसिंग बमनावत, तेसज जाधव व अन्य युवकांविरुद्धही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MSRTC Strike News : एसटी कर्मचाऱ्यांना मोठा फटका, आंदोलनामुळे आर्थिक गणित बिघडलं
पोलीस शिपाई पदाची भरती परीक्षा २८ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर यादरम्यान घेण्यात आली. यात जयपाल आणि अर्जुन सहभागी झाले होते. आपापल्या नावावर अन्य युवकांनी परीक्षा, चाचणी द्यावी, यासाठी जयपाल व अर्जुनने विशाल लखवाल याच्याशी संपर्क साधला. त्याला १३ लाख रुपये देण्याचेही ठरले. विशालने साथीदारांची मदत घेतली. शारीरिक चाचणी जयपालऐवजी मिथुनने तर लेखी परीक्षा तेजसने दिली. अर्जुनऐवजी अन्य आरोपींनी शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा दिली. जयपाल व अर्जुन या दोघांचीही पोलीस दलात निवड झाली. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दोघांच्याही दस्तऐवजांची तपासणी केली. जयपाल व अर्जुनऐवजी अन्यच युवकांचे छायाचित्र त्यावर दिसले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा संपूर्ण प्रकार समोर आला. सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी गिट्टीखदान पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

आणखी दहा जण?

पोलीस भरती प्रक्रियेत मूळ उमेदवारांऐवजी अन्य युवकांनी परीक्षा दिली. असा प्रकार दहा जणांची केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी निवड झालेल्या सर्वच उमेदवारांच्या दस्तऐवजांची कसून तपासणी सुरू केली आहे.

वीजबिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणाकडून मोठी कारवाई, नागरिकांमध्ये गोंधळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here