द्वारा संपादित महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉम | अद्यतनित: 7 जानेवारी 2022, सकाळी 10:38

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. जाणून घेऊया निकालाचे लाइव्ह अपडेट्स…

कोल्हापूर-बँक

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकाल

जिल्ह्यातील राजकारणाच्या दृष्टीनं प्रचंड महत्त्व असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजप आघाडी विरुद्ध शिवसेना अशी चुरस आहे.

निकालाचे लाइव्ह अपडेट्स:

 • आघाडीच्या नेत्यांनी रचलेला चक्रव्यूह शिवसेनेनं भेदला आहे; खासदार संजय मंडलिक यांची पहिली प्रतिक्रिया

 • शिवसेना खासदार संजय मंडलिक, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांचा सत्ताधाऱ्यांना धक्का

 • गडहिंग्लज विकास सेवा संस्था गटात संतोष पाटील विजयी

 • भुदरगड विकास संस्था गटात रणजीत पाटील विजयी

 • राधानगरी विकास सेवा संस्था गटात रणजित पाटील विजयी. रणजित पाटील हे माजी आमदार के पी पाटील यांचे चिरंजीव

 • शाहुवाडी विकास सेवा संस्था गटात रणवीर गायकवाड यांनी केला विद्यमान संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर यांचा पराभव

 • आजरा सेवा संस्था गटात विद्यमान संचालक अशोक चराटी पराभूत. सुधीर देसाई विजयी

 • भाजप-काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी समोर शिवसेनेचं आव्हान

 • बँकेतील एकूण २१ जागांपैकी १५ जागांवर झाली होती निवडणूक.

 • सकाळी आठ वाजता झाली मतमोजणीला सुरुवात

 • कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल 2021 थेट अद्यतने
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here