औरंगाबाद : पहिल्या पत्नीच्या निधनानंतर दुसरे लग्न करणाऱ्या पित्याने पोटच्या मुलावर दुसऱ्या बायोकोच्या मदतीने बारा वर्षीय मुलाचा अमानुष छळ केल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. घरकाम करायला लावण्यापासून ते लाटणे, कुकरचे झाकनाने मारहाण करुन अनेकदा मेणबत्तीचे चटके देखील दिले. आजोबाकडे राहण्यासाठी गेलेल्या पीडित मुलाच्या सख्या मोठ्या भावाला हा प्रकार कळाल्यानंतर त्याने बेगमपुरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरुन आई वडिलांवर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, तक्रारदार २१ वर्षीय मुलाच्या आईचे २०१५ मध्ये निधन झाले. २०१६ मध्ये त्याच्या वडिलांनी नुसरत खान नामक महिलेसोबत दुसरे लग्न केले. दोघेही भाऊ त्यांच्यासोबत राहत होते. मात्र, शुल्लक कारणावरुन वडील व सावत्र आई सतत वाद घालून शिविगाळ करायला लागले. त्यामुळे २१ वर्षीय भाऊ सहा महिन्यापुर्वी आरेफ कॉलनीत राहणाऱ्या आजोबाकडे राहण्यासाठी गेले होते. छोटा भाऊ मात्र वडील व सावत्र आई सोबत राहत होता. मात्र, त्यानंतर आई वडिलांनी बारा वर्षाच्या मुलाला काडीच्या पेटीने व मेणबत्तीने चटके देणे सुरू केले.

वीजबिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणाकडून मोठी कारवाई, नागरिकांमध्ये गोंधळ
लाटण्याने, कुकरचे झाकणाने, लाकडाने मारहाण करत शिवीगाळ करत होते. २७ डिसेंबररोजी सावत्र आई नुसरतने बारा वर्षाच्या भावाच्या तोंडावर बुक्का मारुन दात पाडून जखमी केले. त्यानंतर भिंतीवर डोके आपटले. यात त्याला चक्कर सुरू झाल्या. २८ डिसेंबर रोजी सकाळी मोठा भाऊ लहान भावाला भेटण्यासाठी गेला असता तोंडाला मार लागलेला दिसला. त्याने विचारणा केल्यावर त्याने सर्व घडलेला प्रकार सांगितला.

यामुळे मोठ्या भावाने त्याला तत्काळ सोबत आजोबाकडे नेले. त्यानंतर त्याचे वडील त्याच्या मागे मागे आरेफ कॉलनीत दाखल झाले. तू माझ्या लहान मुलाला का घेवून आला, असे म्हणत सोबत घेऊन जाण्यासाठी वाद घालायला सुरवात केली. पण मोठ्या मुलाने तीव्र विरोध केल्याने वडिल निघून गेले. त्यानंतर त्याने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

धक्कादायक! पोलीस भरतीत उमेदवारांऐवजी अन्य युवकांनी दिली परीक्षा, कागदपत्रं पाहिली अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here