संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी रोषण पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२६ मार्च) दुपारी साडेबाराच्या सुमारास शहरातील इस्लामपुरा मशीद नगर रोड याठिकाणी जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करीत सलमान अब्दुल शेख (वय ३५, रा. इस्लामपूर, संगमनेर), माजीद हरून शेख (वय ३३, रा. नाईकवाडपुरा, संगमनेर), आजीमखान नासिरखान खान (वय ३८, रा. रहेमतनगर संगमनेर), निजामुद्दीन फकीर मोहमद तांबोळी (वय ५९, रा. करुले, ता. संगमनेर), चांद अब्बास (वय ६५, रा. मेंढवण, ता. संगमनेर), शोएब शाबीर खतीन (वय २२, रा. सुकेवाडी रोड संगमनेर) तसेच पळून गेलेले मौलाना अकिल शकिर काकर, सलीम मिश्री व इतर १५ ते २० जणांनी एकत्र येत नमाज अदा केला होती.
शहर पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत देशव्यापी लॉकडाऊन धुडकावून गोळा होणाऱ्या आणि स्वत:सहीत इतरांचाही जीव धोक्यात घालणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर संगमनेर उपविभागात पोलिसांनी शुक्रवारी मुस्लीम समुदायाच्या सर्व इमामांना आणि धार्मिक प्रमुखांना मशिदीत गर्दी न करता आपल्या घरातच नमाज अदा करण्याची विनंती केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times