मुंबई: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी अर्थात अभिनेत्री अनुष्का शर्मासुद्धा आता क्रिकेटच्या मैदानात उतरली आहे. आश्चर्यचकित होऊ नका; अनुष्कानं तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘चकडा एक्सप्रेस‘ असं या सिनेमांचं नाव आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामीवर आधारित आहे. अनुष्का सिनेमात झुलनच्या भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी ‘चकदा एक्सप्रेस’चा एक टीझर व्हिडीओदेखील नुकताच शेअर केला असून तो सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झालाय.

टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी अनुष्काचं कौतुक केलं असून तिला शुभेच्छा दिल्या आहेत, तर बऱ्याच जणांनी तिला ट्रोल केलं आहे. झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर चित्रपट आहे, पण अनुष्काचा लुक प्रेक्षकांना तितकासा आवडला नाहीए. अनुष्का झुलन गोस्वामी सारखी दिसत नसल्याचं म्हटलं जात आहे. तर अनुष्का ऐवजी एखाद्या नवीन अभिनेत्रीला संधी देता आली असती, असं मत देखील अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे.

ट्विट

ट्विट

शेअर केली पोस्ट
अनुष्का तीन वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन करतेय. याविषयीच्या भावना मांडणारी एक लांबलचक पोस्ट तिनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘चकदा एक्सप्रेस’ हा तिच्यासाठी महत्त्वाचा चित्रपट का आहे, हे तिनं यात स्पष्ट केलं आहे. अनुष्का म्हणाली की, ही कथा त्यागाची कथा आहे. झुलन गोस्वामीचं जीवन सर्वांना प्रेरणादायी आहे. ‘चकदा एक्सप्रेस’मध्ये माजी महिला क्रिकेट कर्णधाराचा संघर्ष आणि धैर्याचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here