सिंधुदुर्ग बातम्या : गुजरात-जामनगर येथून एक फ्लोटिंग पंटून समुद्रातून ओढत केरळमधील कोचीन बंदरांमध्ये निघालेला टग (केबी – 21) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बंदरासमोर अकरा वावमध्ये बंद पडला होता. टगच्या दोन्ही इंजिनच्या पंख्यांमध्ये मोठे जाळे अडकल्याने इंजिन बंद पडले होते. मेढा- मालवण येथील मच्छीमार आणि स्कुबा डायव्हर्स यांनी दोन दिवस पंखा जाळीमुक्त करण्याची मोहीम राबविली. आणि टग फ्लोटिंग पंटूनसह केरळमधील कोचीनच्या दिशेने रवाना झाला.
माळवण बंदरातील मच्छीमार आपल्या बल्यावाद्वारे मासेमारी करून मालवण बंदरात परतत असताना त्यांनी टग आणि त्याच्या पाठिमागे फ्लोटिंग पंटून बंद स्थितीत उभा असल्याचे पाहिले. त्यांनी टगवरील खलाशांकडून माहिती घेतली त्यावेळी इंजिन बंद पडल्याच सांगितले. मालवण मेढा येथील आपल्या स्कुबा डायव्हिंग व्यावसायिकांद्वारे काही मदत करता येईल यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्यानंतर स्कुबा डायव्हर्सनी पाण्यात जाऊन टगच्या दोन्ही इंजिनच्या पंख्यांमध्ये पाहिले तेव्हा इंजिनच्या पंखांमध्ये जाळी अडकल्याचे दिसलं
मच्छीमार मासेमारीसाठी वापरात असलेले मोठे जाळे अडकल्याने मच्छीमार आणि स्कुबा डायव्हिंग यांनी इंजिनचा पंखा जाळीमुक्त केले. मात्र जाळे काढण्यासाठी दोन दिवस लागले. आज त्यानंतर ढंग फ्लोटिंग पंटूनसह कोचीनला रवाना झाला. मोहिमेत उमेश हुलें, रोहित कवटकर, नारायण पेडणेकर, सर्वेश पराडकर, महेश शिंदे, सुरज लोणे, गौरव जोशी, जयेंद्र लोणे, योगेंद्र कुबल, अनिकेत जोशी, ओंकार पांगे आदींनी सहभाग घेतला. या सर्वांचे टगवरील खलाशांनी आभार मानले. पंख्यात अडकलेल्या जाळ्यांचे अवशेष आपल्यासमवेत कोचीनला नेले.
फ्लोटिंग पंटुनाचा वापर
फ्लोटिंग पंटून दुरून एखाद्या बार्जप्रमाणे वाटत असला, तरी प्रत्यक्षात त्याची रचना पूर्णत: वेगळी असते. समुद्रातील तरंगती जेटी वाटावी अशाप्रकारे त्याचा वरील भाग सपाट दिसतो. फ्लोटिंग पंटूनचा उपयोग समुद्रातल्या समुद्रात जहाज दुरुस्तींसाठी केला जातो. मोठ्या बंदरांमध्ये फ्लोटिंग पंटून पाहायला मिळतात. मोठ्या जहाजांच्या तुलनेत कमी खोली असलेल्या पाण्यातही त्या नेता येतात. त्यामुळे त्यांचा उपयोग माल वाहतुकीसाठीही केला जातो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा