विदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांना निरीक्षणाखाली न ठेवण्यात आल्याने करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांना मोठ झटका बसू शकतो. विदेशातून आलेल्या नागरिकांनाच करोनाची लागण अधिक झाल्याचे समोर आले आहे.
ब्युरो ऑफ इमीग्रेशनने १८ जानेवारी २०२० ते २३ मार्च २०२० चा एक रिपोर्ट तयार केला आहे. राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांकडून मागितलेल्या माहितीच्या आधारावर हा रिपोर्ट बनवण्यात आला आहे. यात विदेशातून आलेल्या किती नागरिकांची करोना तपासणी झाली याची माहिती आहे. या रिपोर्टमध्ये आणि भारतात आलेल्या नागरिकांच्या एकूण संख्येत मोठी तफावत आहे, असं राजीव गौबा यांनी पत्रात म्हटलं आहे.
राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी आता विदेशातून आलेल्या सर्व नागरिकांची ओळख पटवून त्यांची करोना तपासणी करून घ्यावी. तसंच त्यांना आरोग्य विभागाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात यावं. यासाठी जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांची मदत घ्यावी, असे निर्देश कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी दिले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times