नागपूर : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात मुंबईत झालेल्या बैठकीस बोटावर मोजण्याइतके पदाधिकारी वगळता पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह अनेकांनी पाठ फिरवली. सत्ता मिळवण्यासाठी लढायचे कसे, यावर खल करण्यात आला. गटबाजी टाळून सामाजिक समीकरणाच्या आधारे उमेदवार निश्चित करण्याची सूचना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत गुरुवारी नागपूर महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा बैठक झाली. मुंबईत राज्यातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. या शृंखलेत झालेल्या बैठकीस जिल्ह्याचे पालक व संपर्कमंत्री, आजी-माजी खासदार, आमदार, गेल्या निवडणुकीत उमेदवार, अखिल भारतीय समितीतील सदस्य, जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, प्रभारी व सहप्रभारी, स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी, गटनेते, सर्व सेलचे प्रमुख यांना बोलावले होते. यातील मोजके पदाधिकारी सोडल्यास अन्य कुणीही गेले नाही. पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने त्यांना निरोप मिळाले की नाही अथवा करोनामुळे आले नाही, असा सवाल कार्यकर्त्यांनी केला आहे. करोनाच्या संकटकाळात मुंबईत बैठक बोलावल्याने अनेक पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राज्यातील एकंदर स्थितीचा विचार करून नागपुरातच बैठक घ्यावी, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांची होती, हे विशेष.

ST Strike Update : अखेर एसटीची चाकं धावली, ‘या’ जिल्ह्यात १०० फेऱ्या पूर्ण
नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे वारंवार जाहीर केले आहे. त्यासाठी संघटनात्मक स्थिती जाणून घेण्यात आली. विजयी होण्यासाठी लढण्यासाठी कशी व्यूहरचना असावी, गटबाजी टाळून उमेदवार कसे निश्चित करावे, एकाच भागातील उमेदवार न देता सर्व भागांचा विचार करावा, याबाबत त्यांनी सूचना केल्या.

शहरातील दोन हजारांहून अधिक बुथवर कशा प्रकारचे संघटन सज्ज केले, याची माहिती शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी दिली. प्रभागातील प्रमुख उमेदवारावर जबाबदारी निश्चित केल्यास, त्याचा फायदा पॅनलला होऊ शकतो, असे नरेंद्र जिचकार यांनी सुचवले. बैठकीस आमदार अॅड. अभिजित वंजारी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, नरेंद्र जिचकार, संजय महाकाळकर यांच्यासह मोजके पदाधिकारी उपस्थित होते.

आज पुन्हा बैठक

पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानासाठी काँग्रेसची आज, शुक्रवारी मुंबईत सकाळी १०.३० वाजता बैठक होणार आहे. डिजिटल नोंदणी समन्वयक व खासदार जोथीमनी प्रमुख वक्ते राहतील. येणाऱ्या काळात डिजिटल नोंदणीवर भर देण्यात येणार आहे.

MSRTC Strike News : एसटी कर्मचाऱ्यांना मोठा फटका, आंदोलनामुळे आर्थिक गणित बिघडलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here