Hingoli : नगर परिषद मार्फत हिंगोली शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2022 आणि माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावनी मा. मुख्याधिकारी यांनी सुरु आहे. त्या अनुषंगाने शहरातील सर्व नागरिकांना, व्यापारांना एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर थांबवावा याकरिता हिंगोली (Hingoli) नगर परिषद तर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये नगर परिषद मार्फत सिंगल युज प्लास्टिक संकलन केंद्र हे नगर परिषद कार्यालयसमोर उभारण्यात आले आहे.नागरिकांकडून एकदाच वापरात असलेले प्लास्टिक जमा करून घेण्यात येत आहे व त्यांना भेट म्हणून कापडी पिशवी देण्यात येत आहे.

सदर संकलन केंद्राचे उद्घाटन हे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. श्री. अजय कुरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी मुख्याधिकारी यांनी हिंगोली शहरातील सर्व नागरिकांना , व्यापारी वर्गाला आवाहन केले आहे कि, या प्लास्टिक संकलन केंद्रामध्ये आपल्या कडील असलेले एकदाच वापरात येणाऱ्या कॅरीबॅग, प्लास्टिक वस्तू जसे कि, प्लास्टिक ग्लास,चमचे,वाट्या,काटे,ताट,कप, स्ट्रॉ ई. प्लास्टिक वस्तू असेल तर येथे जमा करावे. आणि कापडी पिशव्या घेऊन जावे असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.

जर या कार्यालयामार्फत नियुक्त पथका मार्फत तपासणीमध्ये कुठे प्लास्टिक आढळल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.सदर प्लास्टिक वस्तूंचा वापर, साठवणूक,विक्री करणे यावर शासनामार्फत संपूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.तसेच याबाबत नगर परिषदेमार्फत वेळोवेळी जनजागृती करण्यात आली आहे. सदर संकलन केंद्र उद्घाटन प्रसंगी प्रशासकीय अधिकारी श्री. शाम माळवटकर, क. अभियंता श्रीमती सनोबर तसनीम, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, संदीप घुगे, शहर समन्वयक आशिष रणसिंगे, माधव सुकते, अजय मंडले,करण पऊळकर, अथर्व वर्मा,सागर गडप्पा,आकाश गायकवाड,सुमित कांबळे,रोहित लोखंडे,गजानन जगताप ई. उपस्थित होते.

शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोल ची विक्री होऊ नये त्यासाठी  नगरपरिषदेच्या वतीने पथकाची नेमणूक सुध्धा करण्यात आली आहे या माध्यमातून आशा पध्द्तीने प्लास्टिकची विक्री होणाऱ्या दुकानावर सुध्धा कार्यवाही करण्यात येत आहे

या पूर्वीही नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ्ता आणि पर्यावरण संरक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत यामध्ये नगरपरिषदेला अनेक राज्यस्तरीय आणि केंद्र स्तरीय पुरस्कारही मिळाले आहेत
शहरातील घन कचरा व्यवस्थापन आणि कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येते त्याच माध्यमातून शहर स्वच्छ करण्यास मोठी मदत होताना दिसून येत आहे
आता शहराच्या स्वच्छतेसाठी हे नवीन पाऊल उचलल्याने जिल्हाभरात या विषयी चर्चा आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here