हायलाइट्स:

  • मुंबईत करोना रुग्णांची वाढती संख्या, धोका वाढला
  • मुंबई लोकलमधील विनामास्क प्रवाशांमुळे डोकेदुखी वाढली
  • विनामास्क फिरणाऱ्या प्रवासी ठरू शकतात सुपर स्प्रेडर
  • अशा बेजबाबदार प्रवाशांवर कारवाई व्हायला हवी

मुंबई : कोरोना (कोरोना) आणि नवीन व्हेरियंट ओमिक्रॉन (ओमिक्रॉन) रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. दिवसागणिक करोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. मात्र, अद्यापही काही लोक बेजबाबदारपणे वागताना दिसताहेत. करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर काही प्रमाणात पूर्वपदावर आलेल्या मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये पुन्हा गर्दी दिसू लागली आहे. मुंबई लोकलमधील गर्दी बघता करोनाचा संसर्ग अधिक वेगाने फैलावण्याचा धोका असला तरी, बहुतांश प्रवासी खबरदारी घेत आहेत. पण, काही प्रवासी बेजबाबदारपणे वागत असल्याचे चित्र आहे. काही प्रवासी विनामास्क प्रवास करताना दिसत आहेत. तर काहींच्या तर मास्क नाकातोंडाच्या खाली लावलेला दिसतो. त्यामुळे नियमित मास्क लावून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे टेन्शन वाढले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांमुळे आपल्यालाही करोना संसर्ग तर होणार नाही ना, अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Mini Lockdown in Mumbai : मुंबईत मिनी लॉकडाउनची दाट शक्यता; नवीन नियमावली लवकरच…
corona in Mumbai : करोना हॉटस्पॉट ठरतेय धारावी, ‘ही’ एका दिवसातील आकडेवारी धडकी भरवणारी

विनामास्क लोकलमधून प्रवास

लोकलमधून प्रवास करणाऱ्या अशाच एका प्रवाशाने नुकताच आपला अनुभव शेअर केला आहे. त्यांनी ‘नवभारत टाइम्स’च्या प्रतिनिधीला लोकलमधून विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे फोटो पाठवले. हे फोटो गुरुवारी १२.१९ वाजता विरार-चर्चगेट लोकलमधील आहेत. फोटो पाठवणाऱ्या प्रवाशाने नवभारत टाइम्सशी बोलताना सांगितले की, करोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी तो स्वतः करोनाबाधित झाला होता. अनेक दिवस भाईंदरच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या प्रवाशाचा दक्षिण मुंबईत व्यवसाय आहे. काही लोक बेजबाबदारपणे वागत आहेत. त्यामुळे करोना प्रादूर्भाव वाढतो. याचा परिणाम प्रत्येकावर होत असतो, असे त्याचे म्हणणे आहे. वाढत्या रुग्णांमुळे आयुष्य पणाला लागते. लॉकडाऊन लागू केला जातो. दुकाने, काही कार्यालये बंद होतात. उद्योग-व्यवसायांवर परिणाम होतो, त्यामुळे विशेष खबरदारी घेऊन सर्व नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. जेणेकरून करोनाचा फैलाव वाढणार नाही, असेही त्या प्रवाशाने सांगितले.

booster dose: १० जानेवारीपासून बूस्टर डोस, फ्रंटलाइन वर्कर…

‘त्या’ प्रवाशांवर कारवाई व्हायला हवी

काळबादेवी येथील एका दुकानाच्या मालकाने सांगितले की, सर्वसामान्यांसाठी जेव्हा लोकल सेवा बंद होते, तर ते अनेक दिवस घरी जात नाहीत. दुकानातच झोपी जातात. रस्तेमार्गे घरी येणे-जाणे म्हणजे दिवसातील सात आठ तास वाया घालवणे. त्यात खिशातून अधिकचे पैसे जातात ते वेगळेच. मात्र, लोकल बंद होण्यामागे विनामास्क फिरणारे बेजबाबदार प्रवासी आहेत. तर आणखी एका प्रवाशाने सांगितले की, लोकलमधून विनामास्क फिरणाऱ्या प्रवाशांना दोनशे किंवा पाचशे रुपये दंड आकारून काही होणार नाही. जोपर्यंत काही लोकांवर एफआयआर दाखल होणार नाही, तोपर्यंत ते सुधारणार नाहीत.

स्वतंत्र खोली असेल तरच गृहविलगीकरण; महापालिकेची नवी नियमावली जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here