संचारबंदीच्या काळात मद्यविक्री करण्यास मनाई असतानाही इन्स्टाग्रामवरून ऑनलाइन मद्यविक्री करण्यात येत असल्याचा प्रकार विरार पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदी लागू केली आहे. तसेच या संचारबंदीच्या काळात मद्यविक्री बंद करण्यात आली आहे. मात्र तरी अनेक ठिकाणी छुप्या पध्दतीने मद्याची विक्री दामदुप्पट भावाने सुरू आहे. वसईत चक्क इन्स्टाग्रामच्या मदतीने मद्याची विक्री करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. इन्स्टाग्रामवर ‘द लिकर मॅन’ या नावाने खाते उघडून दोन व्यक्ती दारूची विक्री करत होते. याबाबतची माहिती वसईचे अपर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांना मिळाली असता त्यांनी बनावट ग्राहकामार्फत सापळा रचून दारूविक्री करणाऱ्यास अटक केली आहे. ओशियन या बारचा मालक संतोष महंती (२९) आणि आकाश सावंत (२३) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times