हायलाइट्स:
- दहावीत शिकणाऱ्या मुलाने केली आत्महत्या
- शुक्रवारी रात्री घटना उघडकीस
- पोलिसांकडून तपास सुरू
वारजे माळवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदी, त्याचे आई-वडील व बहीण असे चौघेजण काकडे सिटी परिसरात राहतात. आदीचे वडील एका खासगी बॅंकेत नोकरीस आहेत, तर आई एका शाळेत शिक्षिका आहे. मोठी बहीण महाविद्यालयात शिक्षण घेते. आदी जवळच्याच एका शाळेमध्ये दहावीमध्ये शिक्षण घेत होता.
शुक्रवारी घरातील सर्वजण आपापल्या कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी आदीची बहीण घरी आली, त्यावेळी तिला आदीने घरामध्ये गळफास घेतल्याचं आढळून आलं. तिने याबाबत तत्काळ आई-वडिलांना सांगितलं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, याबाबत वारजे माळवाडी पोलिसांनाही माहिती देण्यात आली. आदीने आत्महत्या का केली, याबाबतचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी वारजे पोलीस तपास करत आहेत.