हायलाइट्स:

  • झांजरोळी धरणाला मोठी गळती
  • पालघर तालुक्यातील धरण परिसरातील गावांना भीती
  • परिसरातील गावांना धोक्याचा इशारा
  • ग्रामस्थांना इतरत्र हलवण्यासाठी एनडीआरएफ टीम बोलावणार

पालघर: पालघर तालुक्यातील केळवा रोड रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या झांजरोळी धरणाला मोठी गळती लागली आहे. धरणाला भगदाड पडले असून, धरण फुटल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. धरण परिसरातील गावांना धोक्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. ग्रामस्थांना परिसरातून स्थलांतरित करण्यासाठी एनडीआरएफ पथकांना पाचारण करण्यात आले आहे.

पालघर तालुक्यातील केळवारोड रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या झांजरोळी धरणामधून माहीम, वडराई, दातीवरे, एडवण आदींसह १७ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या धारणाखालील गावांमधील शेतीसाठी या धरणातील पाण्याचा वापर केला जातो. या धरणातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. झांजरोळी गावच्या वरील बाजूस हे धरण आहे. गांभीर्य लक्षात घेऊन धरणाच्या खालील भागातील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

कल्याणमध्ये कठोर निर्बंध; करोना नियमांचे उल्लंघन केल्यास सोसायट्यांना १० हजारांचा दंड
वसतिगृह कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

जलसंपदा विभागाने याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवले आहे. गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ पथकांना पाचारण करण्यात येत आहे. धरणाला पडलेले भगदाड बुजवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. गेल्या अनेक तासांपासून प्रशासन प्रयत्न करत असले तरी, अद्यापही यश आले नाही. त्यामुळे धरणातील पाणी कमी करून भगदाड बुजबण्याच्या प्रयत्नांमध्ये मोठी अडचण येत आहे. पाण्याचा दाब वाढला तर, मोठा भगदाड पडून धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धरणाला मोठा भगदाड पडल्यास मोठा अनर्थ होईल, अशी भीती असल्याने पाटबंधारे विभागाचे अधिकारी जोखीम घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे धरणाच्या अन्य भागातून पाणी कमी करण्यास प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान, या भागातील नागरिकांना तातडीने इतरत्र हलवण्याची गरज भासल्यास एनडीआरएफ पथकांना पाचारण करण्याच्या सूचना पालघर येथील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीला देण्यात आल्या आहेत, असे समजते.

रेड्याचा बर्थडे ! ‘असं’ बर्थडे सेलिब्रेशन कधी पाहिलंय का?

‘करोना हा आजार होता, आता त्याचा बाजार केला आहे’; मनसे आमदाराचे टीकास्त्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here