हायलाइट्स:

  • संगमनेर तालुक्यात खळबळजनक घटना
  • पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसवर दगडफेक
  • दगडफेकीत एक महिला जखमी

अहमदनगर : राज्यभरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही मिटलेला नाही. मात्र राज्य शासनाकडून कारवाईचा इशारा देण्यात आल्याने काही आगारांमधील कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. परिणामी कमी प्रमाणात का होईना एसटी वाहतूक सुरू झाली आहे. अशातच संगमनेर तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली असून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने एसटी बसवर दगडफेक केली. या दगडफेकीत एक महिला जखमी झाली आहे. (सेंट बसवर दगडफेक)

शुक्रवारी पुणे-नाशिक महामार्गावर पिंपळगाव बसवंत आगाराची पुण्याला जाणारी एसटी बस ही संगमनेरपासून पुण्याकडे जात होती. दुपारी ही बस चंदनापुरी घाटात आली असता, घाटाच्या पायथ्याशी असलेल्या धगाडी बाबा मंदिराजवळ झाडाच्या आडोशाला उभे राहून एका अज्ञात व्यक्तीने बसवर दगडफेक केली. त्यात बसमधील एका प्रवासी महिलेला डोक्यात दगड लागून दुखापत झाली.

Maharashtra Mini Lockdown : दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी; कसं असेल राज्यातलं मिनी लॉकडाऊन!

जखमी महिलेवर गुंजाळवाडी येथील वृंदावन हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. बसवाहक सागर लक्ष्मीकांत बनकर व चालक विक्रम अशोक पाटील हे सुखरूप आहे.

दरम्यान, घटनेची माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे व डोळासणे महामार्गाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here