Maharashtra Corona Guidelines : राज्य सरकारने राज्यात मिनी लॉकडाऊनची (Maharashtra mini lockdown) घोषणा केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार राज्यात रात्रीची संचारबंदी (Night Curfew in Maharashtra) लागू असणार आहे.

उद्धव ठाकरे, (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
- राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
- पहिल्या लाटेमध्ये सलून चालकांचं आणि कामगारांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे आता 50 टक्के क्षमतेनं सलून चालविण्याची मुभा
- खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
- हॉटेल रेस्टॉरंट रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
- शॉपिंग मॉल ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार
- पूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसने वाहतूक करण्यास परवानगी
राज्यात काय काय बंद राहणार?
- खेळाची मैदानं, उद्यानं, बागा, बंद
- राज्यातील सगळी पर्यटन स्थळ टोटली बंद राहणार
- स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णत: बंद राहणार
- एंटरटेन्मेंट पार्क, प्राणीसंग्रहालये, संग्रहालये, गडकिल्ले पुढील आदेशापर्यंत बंद
- शाळा कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
लग्न आणि अंत्यसंस्कारासाठी काय नियमावली?
- लग्नाचं शुभकार्य फक्त ५० लोकांच्या उपस्थितीमध्ये करण्याची परवानगी
- अंत्यसंस्कारावेळी २० लोकांना उपस्थित राहण्यास मुभा
- सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना ५० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
वेब शीर्षक: महाराष्ट्र मिनी लॉकडाऊन रात्री कर्फ्यू कोरोना मार्गदर्शक तत्त्वे नवीन नियम आणि कायदे
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून